जाळ अन् धूर संगटच - फॅन्ड्री आणि सैराटनंतर नागराज मंजुळे यांचा नवीन सिनेमा आलाय भाऊ....टीझर बघून घ्या !!

Subscribe to Bobhata

फॅन्ड्री आणि सैराटची निर्मिती केल्यानंतर झी-स्टुडीओ पुन्हा एकदा नागराज मंजुळे यांच्या सोबत नवीन सिनेमा घेऊन येत आहे. लगेच प्रश्न पडले असतील ना - फिल्मचं नाव काय आहे ? मुख्य भूमिकेत कोण असेल ? कथा काय आहे ??

राव, यातलं कायबी सांगण्यात आलेलं नाही. प्रेक्षकांना २० सेकंदाच्या लहानशा टीझर मधून सिनेमा लवकरच येणार असल्याचं कळवण्यात आलंय. झी वाल्यांच्या नेहमीच्या मार्केटिंग स्टाईलने या सिनेमाचे सगळे पत्ते एक-एक करून खोलले जातील असं दिसतंय.

...तोवर हा टीझर बघून घ्या. बघा तर टीझर बघून सिनेमाविषयी काही अंदाज बांधता येतोय का !!