‘बाहुबली २’ चा प्रीमियर शो रद्द...वाचा नक्की काय झाले?

उद्या बाहुबली प्रदर्शित होणार म्हणून आपण सारेच प्रचंड उत्सुकतेत होतो. विनोद खन्ना यांच्या निधनाच्या बातमीने साऱ्या आनंदावर पाणी पडले.

बॉलीवूड मधला एक हँडसम हिरो हरपला. सर्व स्थरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. ‘बाहुबली २’ च्या संपूर्ण टीमकडूनही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्याच बरोबर बाहुबलीच्या निर्मात्यांनी एक स्तुत्य निर्णय घेतला आहे.

उद्या बाहुबली रिलीज तर होईल पण आजचा मुंबईमध्ये होणारा बाहुबली २ चा प्रीमियर रद्द करण्यात आला आहे. खुद्द एस. एस. राजमौली यांनी ही बातमी दिली आहे मंडळी.

 

सबस्क्राईब करा

* indicates required