computer

या माणसाने बाईक लिफ्टमध्ये ठेवून ५ व्या मजल्यावर असलेल्या आपल्या घरी का नेली?

 देशात आणि जगातही सध्या इलेक्ट्रिक बाईक्सची चलती आहे. पेट्रोलच्या मानाने अगदीच कमी चार्जिंग खर्च असल्याने लोकांचा मोठा ओढा या गाड्यांकडे आहे. चार्जिंग स्टेशन्स नसणे ही मोठी समस्या या गाड्यांची आहे. बंगळुरू येथे मात्र चार्जिंगवरून एक अजब किस्सा घडला आहे. 

विश गांटी या जीएम ऑटोग्रीडचे व्हाईस प्रेसिडेंट असलेल्या  इलेक्ट्रिक बाईक वापरकर्त्यांनी लिंक्डइनवर एक किस्सा लिहिला आहे. त्यांना आपल्या सोसायटीमध्ये चार्जिंग स्टेशन इन्स्टॉल करायचे होते. या चार्जिंग स्टेशनचे सर्व फायदे त्यांनी सांगितले तरीही त्यांना कोणी हे स्टेशन काही लावू दिले नाही. 

तब्बल चार महिने त्यांनी प्रयत्न केले. शेवटी कंटाळून त्यांनी सत्याग्रह करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी लावलेली डोक्यालिटी मात्र भन्नाट आहे. त्यांनी बाईक लिफ्टमध्ये ठेवली आणि थेट ५ व्या मजल्यावर असलेल्या आपल्या घरी नेली. किचनमध्ये गाडी घेऊन  तिथेच ही गाडी चार्ज केली. 

त्यांनी किचनमध्ये चार्जिंगला लावलेल्या गाडीचा फोटोसुद्धा शेयर केला आहे. हा फोटो वायरल व्हायला वेळ लागला नाही. बंगळुरू सारख्या शहरात ज्याला इलेक्ट्रिक वाहनांची राजधानी म्हटले जाते. अशा ठिकाणी त्यांना अडचणी येत असतील तर इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल!!

इलेक्ट्रिक वाहने आणि चार्जिंग स्टेशन्सबद्दल गैरसमज दूर व्हावे आणि लोकांचे या विषयाकडे ध्यान खेचले जावे याचसाठी आपण ही आयडिया केल्याचे पण ते सांगतात. आता हा फ़ोटो देशभर वायरल झाल्यावर तरी त्यांच्या सोसायटीत चार्जिंग स्टेशन बसेल अशी अपेक्षा आपण करू शकतो.

सबस्क्राईब करा

* indicates required