computer

भारताची लढाऊ विमानं आता हायवेवरूनही आकाशात झेप घेऊ शकतील

भारतीय संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने ऐतिहासीक असे पाऊल टाकण्यात आले आहे. राजस्थान येथील बारमेर या पाकिस्तानला लागून असलेल्या नॅशनल हायवेवर फायटर प्लेनचे लँडिंग करण्यात आले आहे.या नॅशनल हायवेच्या ३ किमीचा हिस्सा अशा पध्दतीने बनविण्यात आला आहेजिथे फायटर प्लेन लँड करता येऊ शकेल. एनएचएआयने एयरफोर्ससोबत मिळून या हवाई पट्टीची निर्मिती केली आहे.

देशाचे संक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी वायुसेनेच्या विमानात बसून या एयर स्ट्रीपवर लँडिंग करून उदघाटन करणार आहेत. या स्ट्रीपचे सामरिक महत्व मोठे आहे कारण बारमेर  हे भारत पाकिस्तान बॉर्डरच्या अगदी जवळ आहे. या एयर स्ट्रीपचा उपयोग फॉरवर्ड बेसच्या रूपात केला जाणार आहे. 

एनएच 95 हा भारतातील पहिला राष्ट्रीय महामार्ग असेल ज्याचा उपयोग वायुसेनेच्या विमानांना इमर्जन्सीमध्ये उतरविण्यासाठी होणार आहे. इमर्जन्सी परिस्थितीत किंवा मदतकार्य करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय महामार्गावर लँडिंग स्ट्रीप बनविण्याची तयारी जोरात सुरू आहे. देशात अशी एकूण २८ लोकेशन तयार केली जात आहेत. 

युद्धाच्या वेळेस शत्रूदेश नेहमी महत्वाच्या एयरबेसला टार्गेट करून त्यांना उध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात. याचा उद्देश असा असतो की फायटर जेट लँड किंवा टेकऑफ करू शकणार नाहीत. ५० वर्षांपूर्वी जेव्हा भारत पाकिस्तान युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती तेव्हा, वायुसेनेच्या भुज येथील बेसवर पाकिस्तानी जेट्सनी बॉम्बहल्ला केला होता. 

या कारणाने एयरबेसचा रणवे उध्वस्त झाला होता. युद्धकाळात तेथे सर्व एअर ऑपरेशन्स थांबली होते. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये देशात विविध ठिकाणी एयरस्ट्रिप्स बनविल्या जात आहेत. यातून अनेक उद्धिष्टे साध्य होऊ शकतात. 

अवघ्या १९ महिन्यांमध्ये या स्ट्रीपचे काम पूर्ण करण्यात आले आहे. भारत पाकिस्तान सीमेपासून फक्त ४० किलोमीटर या स्ट्रीपचे अंतर आहे. याची रुंदी ३३ मीटर असून लांबी ही ३ किलोमीटर आहे. भारताच्या संरक्षण सिद्धतेत या निमित्ताने अजून एक मानाचा तुरा रोवला गेला असे म्हणता येईल.

सबस्क्राईब करा

* indicates required