computer

आपल्या घरात कोक का असावा याची ३२ कारणे!! तुम्हांला आणखी एखादं नवं कारण माहित आहे??

ठंडा मतलब कोका कोला... कोका कोलाची ही टॅग लाईन अनेकांना भुरळ घालणारी. वास्तविक कोक असो वा इतर कुठली, शीतपेये तब्येतीसाठी कशी हानिकारक हे सांगणारे डझनावारी लोक तुम्हाला भेटतील. त्यामुळे तसा कोक आरोग्याच्या दृष्टीने निषिद्धच! पण या कोका कोलाचे इतर उपयोग इतके आहेत, की घरी एक तरी बाटली (अर्थातच कोकची!) असावी असे तुम्हाला नक्की वाटेल. बघूयात ही एवढीशी बाटली काय किमया करते.

१. कपड्यांवरचे तेलाचे आणि डाग काढण्यासाठी कोक वापरा.

२. गंजाचे डाग काढण्यासाठी कोकमध्ये फडके बुडवून त्याने डागावर चोळा.







.

३. कपड्यावरील रक्ताचे डाग काढण्यासाठी कोकमध्ये फडके बुडवून त्याने डागावर चोळा.

४. गॅरेजमध्ये जमिनीवरील तेलाचे, इंजिन ऑइलचे आणि वंगणाचे डाग काढणे.

५. गंजलेले व लाकडात पक्के बसलेले खिळे सैल करण्यासाठी त्यावर कोक ओता.

६. बागेतील झाडाझुडपांचे नुकसान करणार्‍या गोगलगायींना मारण्यासाठी त्यावर कोक ओता. कोकमधील अ‍ॅसिडमुळे त्या मरतात.

७. बागेतील हिरवळ ताजी हिरवीगार व टवटवीत दिसण्यासाठी त्याच्यावर कोक ओता.

८. दम्याचा झटका येऊ नये म्हणून कोक प्या. त्यामधील कॅफिन दम्याचा झटका येण्यापासून थांबवते.

९. बर्फाळ प्रदेशात गाड्यांच्या विंडशील्डवर म्हणजेच पुढच्या बाजूच्या काचेवर बर्फ साचते. कोक टाकल्याने बर्फ वितळते.

१०. जळक्या कढया व भांडी स्वच्छ करण्यासाठी कोकमध्ये बुडवून ठेवा.

११. कारच्या बॅटरीची टर्मिनल्स साफ करण्यासाठी त्यावर कोक ओता.

१२. पोटाचे विकार, डायरिया, मळमळ कमी करण्यासाठी कोक प्या.

१३. उचक्या कमी करण्यासाठी थंडगार कोकने गुळण्या करा.

१४. इंजिन साफ करण्यासाठी कोकचा वापर करा.

१५. केस कुरळे करण्यासाठी फ्लॅट कोक केसांवर ओता, काही मिनिटे तसेच ठेवून नंतर धुवून टाका.

१६. उत्तम दर्जाचे कंपोस्ट खत तयार करण्यासाठी कोकचा वापर करा. कोकमुळे खताची आम्लता वाढते, त्यामध्ये साखरेचा अंश निर्माण होतो आणि त्यामुळे सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते.

१७. केसांमध्ये चुकून च्युइंग गम किंवा बबलगम अडकले असेल तर त्यावर कोक लावा आणि काही मिनिटे तसेच ठेवा. गम आपोआप निघून येईल.

१८. त्वचा मुलायम व रेशमी बनवण्यासाठी तुमच्या रोजच्या क्रीममध्ये चमचाभर कोक मिसळा.

१९. लो फॅट ब्राऊनी बनवण्यासाठी मिश्रणात कोक मिसळा.

२०. केसांना दिलेला रंग किंवा हेअर डाय काढून टाकायचा असल्यास त्याच्यावर डाएट कोक ओता.

२१. टॉयलेट साफ करण्यासाठी त्यामध्ये ग्लासभर कोक ओता. थोडावेळ ठेवून नंतर फ्लश करा.

२२. कोकाकोलाचा अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे आजकाल भारतातील शेतकरी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे. महागड्या कीटकनाशकांच्या तुलनेत कोकाकोला स्वस्त असल्यानेे शेतकर्‍यांना तो परवडतो. कोकाकोलामध्ये असलेली साखर मुंग्या

२३. गालिच्यावर पडलेले मार्करचे डाग काढण्यासाठी त्यावर थोडासा कोक ओता, थोडे घासा आणि साबणाच्या पाण्याने स्वच्छ करा. मात्र गालिचा पांढऱ्या किंवा फिकट रंगाचा असेल तर ही पद्धत वापरू नका, कारण या उपायात गालिच्यावर कोकचे तपकिरी रंगाचे डाग पडू शकतात.

२४. बार्बेक्यू सॉस तयार करताना थोडासा कोक मिसळा. सॉसला परफेक्ट फ्लेवर येईल.

२५. चष्म्याच्या किंवा गॉगलच्या काचा साफ करण्यासाठी त्यावर थोडा कोक शिंपडून कोरड्या फडक्याने पुसा. नंतर चिकटपणा घालवण्यासाठी परत एकदा पाण्याने साफ करून फडक्याने पुसून घ्या.

२६. स्वयंपाकघरात मटण मऊ करण्यासाठी मीट टेंडरायझर म्हणून कोक वापरा. त्यामधील अ‍ॅसिडमुळे मटण, मांस हे लवकर मऊ होतात व शिजतात.

२७. खिडक्यांचा धुरकटपणा कमी करून त्या स्वच्छ करण्यासाठी कोका कोला वापरा.

२८. जुनी धातूची नाणी स्वच्छ करण्यासाठी व त्यावरील डाग काढण्यासाठी ती कोका कोलामध्ये बुडवून ठेवा.

२९. तुमच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोजना सेपिया फिनिश देण्यासाठी कोकाकोलामध्ये फोटो थोडा वेळ बुडवून ठेवा.

३०. जुने, काळे पडलेले दागिने स्वच्छ करण्यासाठी आणि त्यांना पॉलिश करण्यासाठी कोका कोलामध्ये बुडवून ठेवा.

३१. डोकेदुखीवर जर तुम्ही अ‍ॅस्पिरिन, आयबीयुप्रोफेन यासारखी औषधे घेत असाल तर त्याच्या जोडीला थोडासा कोका कोला पण घ्या. डोकेदुखी लवकर थांबते असा बर्‍याच जणांचा अनुभव आहे. कोका कोला बाजारात आल्यापासून तो डोकेदुखीवर प्रभावी आहे असे लक्षात आले होते.

३२. अझालिया आणि गार्डनीया कुळातील वनस्पतींना फुले भरपूर येण्यासाठी कोक खत म्हणून मातीत मिसळतात.

 

हे सगळे जगभरातील कोकप्रेमींनी शोधून काढलेले उपाय आहेत. तुम्हालाही कोकशी संबंधित अशा काही युक्त्या माहीत असतील तर अवश्य शेअर करा

सबस्क्राईब करा

* indicates required