computer

वऱ्हाड निघालंय लंडनला- तुमचा यातला आवडता संवाद कोणता?

मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, आणि हो, पुणे!! या सगळ्या प्रदेशांतल्या भाषांचा आपलाच एक मस्त ठसका आहे. विदर्भ-मराठवाड्यातले लोक पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना पुणे-मुंबई पलीकडे महाराष्ट्र माहित नसतो असं उपहासाने म्हणतात. पण पश्चिम महाराष्ट्रच काय, आख्ख्या जगापर्यंत मराठवाडा आणि मराठवाडी भाषेचा ठसका 'वऱ्हाड निघालंय लंडनला' ने पोचवलाय. लक्ष्मणराव देशपांडेंनी या एकपात्री नाटकाचं लेखन-दिग्दर्शन-अभिनय-कपडेपट हे सगळं एकहाती केलं होतं. आता संदिप पाठकही हे नाटक छान करत असला तरी ज्यांनी देशपांडेंना रंगमंचावर पाह्यलंय, ते मूळ नाटक विसरणं शक्य नाही. 

या नाटकातलं तुम्हांला काय आवडतं या प्रश्नांचं एकच उत्तर देता येणं अशक्य आहे. म्हणजे लक्ष्मणराव देशपांडेंचा अभिनय, मध्येच आवाज बदलणं, मध्येच नाक मुरडणं, ब्रिटिश ऍक्सेन्ट की गावच्या वातावरणात फिट्ट बसणारे- हास्याचे फवारे उडवणारे डायलॉग्ज? अवघड आहे राव. पण असो. आज लक्ष्मणराव देशपांडेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या एव्हरग्रीन- अवीट नाटकातल्या आपापल्या आवडत्या संवादांची उजळणी करूया. कसं??

१. हे बघ, हात नीट ठेवून बोल. एकदा असं, मग असं, आणि आता असं!! आमच्या मनामंदी काय काय येतं ना मंग!!

२. नाहीतरी हे पत्र वाचणार कोण? एक तो, एक मी, आणि मध्ये हायेत कोण??

३. दुपारची येळ ना?नक्की सांगतो- पार्वताबाई

४. होल वावर इज अवर!!

५. You don't know बस्ता?? बस्ता is cloth upon cloth upon cloth, साड्या upon साड्या upon साड्या, खणा upon खणा upon खणाणाणाणाणाणा.....

६. चड्ड्या घेतल्या का, चड्ड्या घेतल्या का, चड्ड्या घेतल्या का!!! हे हे हे हे सगळं भरून नुसत्या चड्ड्याच घेतल्यात. 

७. काडीचं काम करत नाही...

८. कसा झालाय नमुना?

९. ज्यूडी? कसली जुडी? कोथिंबिरीची की मेथीची??

१०. हिच्यामुळे हरभरा टरारून वर!! हरभरी मेली!!!!

सबस्क्राईब करा

* indicates required