computer

दिनविशेष: उर्दू लेखक सआदत हसन मंटोच्या कथांपैकी तुमची आवडती कथा कोणती?

उर्दूलेखक   सआदत हसन मंटो हे नांव लेखकांच्या मांदियाळीत अत्यंत आदरानं घेतलं जातं.  त्यांच्या  लघुकथा प्रसिद्ध आहेत.  त्यांच्या कथांचे विषय  नेहमीच समकालीन लेखकांहून वेगळे  होते. आजही त्यांच्या कथा वाचल्या तरी त्या तितक्याच टोकदार आणि वाचकाला अंतर्मुख करणार्‍या आहेत. त्यांची स्त्रीपात्रंही त्याकाळच्या साहित्याच्या मानाने बरीच बंडखोर आणि स्वतंत्र विचारांची होती.  त्यांच्या निर्भीडपणामुळं आणि  काही कथाविषयाच्या मांडणीवरून त्यांच्यावर खटलेही भरण्यात आले होते.  

अर्थातच ते त्यांच्या कालकीर्दीत आणि नंतरही चर्चेत राहिले. त्यांच्या समग्र कथांचं संग्रहण फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. मंटोंच्या कथांपैकी कुठल्या कथा सर्वोत्तम म्हणून निवडायच्या हा प्रश्नच आहे.  पाहा बरं, तुमची यातली आवडती कथा कोणती ते?

 

काली सलवार

काली सलवार ही मंटोंची १९६१साली लिहिलेली कथा. वाचताना प्रत्येकवेळेस एक नवाच पैलू देऊन जाणारी. अंबाल्यात बस्तान बसलेली आणि नव्या ठिकाणी जम बसवू न शकलेली सुलताना, मोहर्र्मच्य सणासाठी काळी सलवारीची कामना करते. तिला तशी सलवार मिळतेही, पण त्यासाठी ती काय काय हरवून बसते याची ही कथा. 

यूट्यूबवरही दूरदर्शनच्या काळातलं या कथेवरचं चित्रण उपलब्ध आहे,  मंटोंच्या बहुतेक कथा जालावरही वाचनासाठी उपलब्ध आहेत. काळी सलवार तुम्ही इथे वाचू शकता. सदिया सिद्दिकी, इरफान खान आणि के के मेननची भूमिका असलेला एक चित्रपटही डेलीमोशन या साईटवर मोफत पाहता येईल.

 

टोबा टेक सिंह

’टोबा टेक सिंह’ ही मंटोंची १९५५ सालची उपहासगर्भ कथा.  फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तान वेड्या लोकांची अदलाबदल करायचं ठरवतात. ’टोबा टेक सिंह’ गावचा बिशन सिंग नावाचा वेडा शहाण्यांनाही शहाणं करून जातो. ही कथा इथे वाचू शकता. 

या कथेवर पंकज कपूरना टोबा टेक सिंहच्या भूमिकेत घेऊन केतन मेहता एक सिनेमा करत आहेत. २०१७ मध्ये तो रिलीज होईल अशी अपेक्षा आहे. 

ठंडा गोश्त

ठंडा गोश्त ही १९५० साली लिहिलेली एका फाळणीदरम्यानच्या लुटालूटीच्या प्रसंगावरची कथा. ही मंटोंच्या प्रसिद्ध कथांपैकी एक आहे. मंटोंच्या कथा वास्तववादी असतात. कधी कधी ते वास्तव अंगावर येईल इतकं भयानक असतं. ठंडा गोश्तही अशीच थंडपणे क्रूरपणा समोर आणणारी कथा आहे.

 यूट्यूबवर बर्‍याच जणांनी ही कथा सादर केली आहे. ठंडा गोश्तही आंतरजालावर वाचनासाठी उपलब्ध आहे.

खोल दो

’खोल दो’ ही मंटोंच्या सर्वोत्तम कथांपैकी एक मानली जाते. त्यांच्या सर्व कथांमध्ये कदाचित या कथेतली दाहकता सर्वाधिक असेल.

अमृता प्रीतम, सआदत मंटो, या लोकांनी भारत-पाकिस्तान फाळणी आणि त्यात होरपळलेले जीव पाहिले. त्यांच्या अनेक कथांचे विषय फाळणीवरती  बेतलेले आहेत. ’खोल दो’ इथे वाचू शकता.

मंटो की दुनिया

नवाझुद्दिन मंटोच्या रूपात..

नंदिता दास आणि नवाझुद्दिन सिद्दिकी यांनी केलेली मंटोवरील शॉर्टफिल्म नुकतीच यूट्यूबवर रिलीज झाली आहे. 

सबस्क्राईब करा

* indicates required