आय. पी. एल. सामन्यात टॉस फिक्स्ड कि रवी शास्त्रीने केली चूक?
आय पी एल म्हणजे वादविवाद असे समीकरण गेल्या काही वर्षांत बनले आहे. CSK आणि राजस्थान रॉयल्स या डॉन संघाना निलंबनाचा सामानाही करावा लागला आहे. आय पी एल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फिक्सिंगच्या बातम्या नवीन नाहीत. पण यावर्षी पंजाब विरुद्ध कलकत्ता सामन्यात टॉस फिक्सिंगचा नवा प्रकार समोर आला आहे. हा कदाचित क्रिकेटमध्ये असलेल्या भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा पुरावा ठरू शकतो.
या व्हिडिओमधे तुम्हाला टॉस होताना दिसतो. दोन्ही संघाचे कर्णधार मुरली विजय आणि गौतम गंभीर टॉससाठी सज्ज आहेत. मुरली विजय हेड्स म्हणतो नाणे जमिनीवर पडते ते टेल्स असते. म्हणजेच गौतम गंभीर टॉस जिंकला आहे. पण सगळेजण अचानक मुरली विजय टॉस जिंकला असे म्हणत पुढे जातात. कुणालाही या बाबतीत काही चुकीचे झाले असे वाटत नाही. ही फिक्सिंग होती की समालोचक रवी शास्त्रीची चूक होती?
Here's the clip. Murali Vijay calls it wrong, still wins the toss. Shady characters of a filthy league. #TossFixing pic.twitter.com/YKgWiXXniS
— Malay Desai (@MalayD) May 9, 2016
’सत्यविजयी’ या बातम्यांच्या वेबसाईटने ही घटना रवी शास्त्रीची चूक होती असा खुलासा दिला आहे.




