आयपीएलच्या १० संघांमध्ये कुठला खेळाडू रिटेन? तर कोण झालं बाहेर? पाहा संपूर्ण यादी...

नुकताच आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा झाल्यानंतर आता आयपीएल २०२३ स्पर्धेच्या तयारीला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेपूर्वी होणारा लिलाव सोहळा कुठे आणि कधी होणार आहे याची घोषणा देखील करण्यात आली आहे. येत्या २३ डिसेंबर रोजी कोच्चीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. हे मिनी ऑक्शन होण्यापूर्वी संघांना रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची जाहीर जाहीर करायची आहे. ज्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर आहे. चला तर जाणून घेऊया आतापर्यंत कुठल्या संघाने कुठल्या खेळाडूंना रिटेन केले आहे आणि कुठल्या खेळाडूंना रिलीज केले आहे.
चेन्नई सुपर किंग्स : आयपीएल २०२३ स्पर्धेसाठी चेन्नई सुपर किंग्स संघाला अनुभवी खेळाडूंची आवश्यकता असणार आहे. कारण आयपीएल २०२२ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती.
चेन्नई सुपर किंग्ज संघाने रिटेन केलेले खेळाडू : एमएस धोनी, रवींद्र जडेजा, मोईन अली, शिवम दुबे, रुतुराज गायकवाड, डेवोन कॉनवे, मुकेश चौधरी, ड्वेन प्रिटोरियस,दीपक चाहर.
चेन्नई सुपर किंग्ज संघाने रिलीज केलेले खेळाडू : ख्रिस जॉर्डन, एडम मिल्ने ,नारायण जगदीशन, मिचेल सँटनर.
मुंबई इंडियन्स: मुंबई इंडियन्स संघाला देखील आयपीएल २०२२ स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे आगामी हंगामात मुंबई इंडियन्स संघ जोरदार कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
मुंबई इंडियन्स संघाने रिटेन केलेले खेळाडू :
रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, डॅनियल सॅम्स,टीम डेविड, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, ट्रीस्टन स्ट्रब्स, तिलक वर्मा.
मुंबई इंडियन्स संघाने रिलीज केलेले खेळाडू :
फेबियन ॲलेन, कायरन पोलार्ड, टायमल मिल्स, मयंक मार्कंडेय, ऋतिक शोकिन.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर:
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे हे १६ वे हंगाम असणार आहे. मात्र या संघाला आतापर्यंत एकदाही जेतेपद मिळवता आले नाहीये. त्यामुळे या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ मजबूत खेळाडूंना आपल्या ताफ्यात दाखल करून घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने रिटेन केलेले खेळाडू: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, शाहबाज अहमद, रजत पाटीदार
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने रिलीज केलेले खेळाडू: सिद्धार्थ कौल, कर्ण शर्मा, डेव्हिड विली, आकाश दीप.
गुजरात टायटन्स:
गुजरात टायटन्स हा आयपीएल स्पर्धेतील नवा संघ आहे. मात्र या संघाने आपल्या पहिल्याच हंगामात जेतेपदाला गवसणी घातली. आता मिनी ऑक्शनमध्ये हा संघ आणखी काही नवीन खेळाडूंना आपल्या ताफ्यात दाखल करून घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
गुजरात टायटन्स संघाने रिटेन केलेले खेळाडू :
हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर, शुभमन गिल, अभिनव मनोहर, वृद्धिमान साहा, राशिद खान, मोहम्मद शमी, राहुल तेओतिया. रहमानुल्ला गुरबाज
गुजरात टायटन्स संघाने रिलीज केलेले खेळाडू :
मॅथ्यू वेड, विजय शंकर, गुरकीरत मान सिंग, जयंत यादव, प्रदीप सांगवान, नूर अहमद, साई किशोर, वरुण आरोन.
दिल्ली कॅपिटल्स:
दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी एका मजबूत संघाची निवड केली होती. आगामी मिनी ऑक्शनमध्ये काही नवीन खेळाडूंचा या संघात समावेश केला जाऊ शकतो.
दिल्ली कॅपिटल्स संघाने रिटेन केलेले खेळाडू : रिषभ पंत, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, मिचेल मार्श, सरफराज खान, एनरिक नोरखिया, कुलदीप यादव
दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केलेले खेळाडू: शार्दुल ठाकूर, टिम सिफर्ट, केएस भरत, मनदीप सिंग, अश्विन हेबर
कोलकाता नाईट रायडर्स:
कोलकाता नाईट रायडर्स संघाने मिनी ऑक्शनपुर्वी रहमानुल्लाह गुरबाज आणि लॉकी फर्ग्युसनला ट्रेड केले आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघ या खेळाडूंना करू शकतो रिटेन:
श्रेयस अय्यर, सुनील नरेन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, पॅट कमिन्स, नितीश राणा, शेल्डन जॅक्सन, रिंकू सिंग, उमेश यादव
या खेळाडूंना करू शकतो रिलीज:
शिवम मावी, मोहम्मद नबी, चमिका करुणारत्ने, रमेश कुमार, अजिंक्य रहाणे, आरोन फिंच
राजस्थान रॉयल्स :
राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल २०२२ स्पर्धेत जोरदार कामगिरी करत अंतिम फेरित प्रवेश केला होता. यावेळी देखील या संघाकडून चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा असणार आहे.
राजस्थान रॉयल्स संघ या खेळाडूंना करू शकतो रिटेन:
संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, आर अश्विन, युझवेंद्र चहल, शिमरॉन हेटमायर, ट्रेंट बोल्ट, जिमी नीशम, प्रसिद्ध कृष्णा, ओबेद मॅकॉय
या खेळाडूंना करू शकतो रिलीज:
नवदीप सैनी, डॅरिल मिशेल, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, कॉर्बिन बॉस
लखनऊ सुपर जायंट्स :
लखनऊ सुपर जायंट्सने खेळाडूंना कायम ठेवण्याबाबत आणि सोडण्याबाबत अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाहीये. असे मानले जात आहे की मनीष पांडे हे एक मोठे नाव रिलीज होऊ शकते. याशिवाय अंकित राजपूत आणि अँड्र्यू टाय देखील त्या यादीत येऊ शकतात.
पंजाब किंग्स:
पंजाब किंग्सने आधीच कर्णधाराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएल २०२३ साठी संघाने शिखर धवनकडे कर्णधारपद सोपवले आहे. आता कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार आणि रिलीज करणार याबाबत देखील लवकरच निर्णय घेतला जाईल.
सनरायझर्स हैदराबाद :
सनरायझर्स हैदराबाद संघ देखील बहुतांश खेळाडूंना रिलीज करू शकतो. तसेच या संघात काही नवीन खेळाडूंचा प्रवेश पाहायला मिळू शकतो.