या ३ भारतीय क्रिकेटपटूंनी आयपीएल स्पर्धेतून केली आहे १५० कोटींपेक्षा अधिकची कमाई...
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा म्हणजेच आयपीएल स्पर्धा ही जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट लीग स्पर्धा आहे. या लीग स्पर्धेत खेळाडूंवर कोट्यावधींची बोली लागते. भारतातील आणि परदेशातील असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी करून आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवले आहे. तसेच असेही काही खेळाडू आहेत जे रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहचले आहेत.
अशातच जेव्हा आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंबद्दल चर्चा होते, त्यावेळी ३ भारतीय क्रिकेटपटूंचे नाव सर्वात पुढे असते. ते म्हणजे एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा. या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, या तिन्ही खेळाडूंनी आतापर्यंत आयपीएल स्पर्धेतून किती कोटींची कमाई केली आहे.
१) एमएस धोनी (Ms Dhoni) :
या यादीत पहिल्या स्थानी आहे तो भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनी. आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या हंगामाला २००८ पासून सुरुवात झाली होती. या हंगामापासून एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करतोय. २००८ पासून ते २०२० पर्यंत एमएस धोनीने आयपीएल स्पर्धेतील तब्बल १३७ रुपयांची कमाई केली आहे. २००८ मध्ये एमएस धोनीला ८ कोटींची बोली लावून चेन्नई सुपर किंग्ज संघात स्थान देण्यात आले होते. त्यानंतर २०१८ मध्ये त्याला १५ कोटी रुपये इतके मानधन देण्यात आले होते. तसेच आयपीएल २०२२ स्पर्धेत त्याला १२ कोटी रुपये देऊन रिटेन करण्यात आले आहे.
२) रोहित शर्मा (Rohit Sharma):
रोहित शर्माबद्दल बोलायचे झाले तर २००८ च्या हंगामात डेक्कन चार्जर्स संघाने रोहितला केवळ ३ कोटींमध्ये खरेदी केले होते. मात्र गेल्या हंगामापर्यंत रोहित शर्माने १५० कोटींची कमाई केली आहे. गतवर्षी झालेल्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्माला १५ कोटी रुपये खर्च करून रिटेन केले होते. तर यावर्षी त्याला १६ कोटी रुपये खर्च करून रिटेन केले आहे.
३) विराट कोहली (Virat Kohli) :
आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीपासून विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. यावर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने विराट कोहलीला १५ कोटी रुपये खर्च करत रिटेन केले आहे. या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे कर्णधारपद फाफ डू प्लेसिला देण्यात आले आहे. आतापर्यंत विराट कोहलीने आयपीएल स्पर्धेतून १५० कोटींपेक्षा अधिक रुपयांची कमाई केली आहे.
काय वाटतं मंडळी यापैकी कुठला असा क्रिकेटपटू आहे जो आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक कमाई करण्याच्या बाबतीत २०० कोटींचा आकडा पार करेल?




