आपल्या लाडक्या भाईंच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा लवकरच येतोय !!

पु. ल. देशपांडे यांची महाराष्ट्राला वेगळी कही ओळख करून द्यायची गरज नाही. लेखक, नाटककार, अभिनेता, कथाकार, पटकथाकार, दिग्दर्शक, असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व. आता हेच आपले ‘पुलं’ उर्फ ‘भाई’ आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.

महेश मांजरेकरांनी सुरु केलेल्या ‘फाळकेज् फॅक्टरी’ या नवीन कंपनीतून निघणारं नवं कोरं प्रोडक्ट म्हणजे ‘भाई : व्यक्ती की वल्ली’. पु ल. देशपांडे यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारित असणार आहे. महेश मांजरेकरांनी म्हटल्या प्रमाणे पुढच्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा रिलीज करण्यात येईल.

सिनेमाची घोषणा झाली असली तरी काम सुरु व्हायला अजून बराच कालावधी आहे. मुख्य प्रश्न म्हणजे सिनेमात ‘भाईंची’ भूमिका कोण करणार ?....एक वर्ष तरी आपल्याला वाट बघावीच लागेल राव !!

सबस्क्राईब करा

* indicates required