तब्बल १२५ कलाकारांनी साकार केलेला जगातील पहिला चित्रमय सिनेमा !!

Subscribe to Bobhata

एखाद्या कलाकाराला त्याच्याच कलाकृतीतून श्रद्धांजली देणं काय असतं हे या भन्नाट सिनेमातून तुम्ही पाहू शकता. ‘व्हिन्सेंट व्हॅन गॉग’ हा एक अजरामर-अभिजात चित्रकार होऊन गेला. त्याच्या आयुष्यावर चित्रपट तयार करताना दिग्दर्शकाने एक अनोखी शक्कल लढवलीय आणि ती आता पूर्णपणे साकार झाली आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘लव्हिंग व्हिन्सेंट”.

(स्रोत)

‘व्हिन्सेंट व्हॅन गॉग’ च्या चित्रांची एक अनोखी शैली होती. त्याची चित्रे एकाचवेळी गूढ आणि कलाकाराचा निरागसपणा दोन्ही दाखवून जायची. याच कलाकाराचं आयुष्य पडद्यावर दाखवताना त्याच्याच चित्राच्या शैलीचा वापर करण्यात आला आहे. म्हणजेच संपूर्ण सिनेमा एखाद्या चित्रासारखा दिसेल. यातील पात्र, स्थळ, वस्तू सर्व काही आपल्याला व्हिन्सेंटच्या चित्रमय जगात घेऊन जातील.

(स्रोत)

लव्हिंग व्हिन्सेंट सिनेमाच्या तब्बल ६५००० फ्रेम्स आहेत आणि ती सर्वच्या सर्व तैलचित्रे आहेत. ही तैलचित्रे काढण्यासाठी १२५ चित्रकारांची टीम काम करत होती. या प्रकारचा सिनेमा या आधी कधीही बनलेला नाही. त्यामुळंच  जेव्हा सहा वर्षा पूर्वी Dorota Kobiela आणि Hugh Welchman या दोघांनी मिळून या फिल्मवर काम करण्यास घेतलं तेव्हा त्यांना आर्थिक मदत करण्यास कोणीही पुढे आलं नाही. पण शेवटी अनेक अडचणींतून सिनेमा साकार झाला.

व्हिन्सेंट व्हॅन गॉग (स्रोत)

तापट, लहरी, आपल्या कलेवर जीवापाड प्रेम करणारा, रागाच्या भरात आपला कान कापून एका वेश्येला नजर करणारा, असा हा व्हिन्सेंट त्याच्याच चित्रांतून जिवंत होताना बघणे म्हणजे एक वेगळंच अनुभव असेल.

भारतात हा सिनेमा अजून रिलीज झालेला नाही. तूर्तास आपण या सिनेमाचा ट्रेलर बघूया.

सबस्क्राईब करा

* indicates required