computer

जाहिरातींसाठी ही नटमंडळी किती रुपये घेत असतील? वाचा ११ बॉलीवूड स्टार्स आणि त्यांच्या जाहिरातींबद्दल..

बॉलिवूड म्हणजे चिक्कार पैसा हे समीकरण प्रत्येकाच्या डोक्यात फिट्ट आहे. म्हणूनच देशभरातील लाखो तरुण बॉलिवूडमध्ये संधी मिळावी म्हणून आटापिटा करतात. हे समीकरण खरे देखील आहे. २००-३०० कोटींमध्ये कमाईचे आकडे आणि ५०-६० कोटी एकेक सिनेमासाठी आकारली जाणारी फी यामुळे याला पुष्टी मिळते.

 सिनेमा तीन तासांचा असतो आणि त्यासाठी काही महिने या हिरो मंडळींना मेहनत घ्यावी लागते. पण टीव्हीवर आपल्याला दिसणाऱ्या काही सेकंदांच्या ऍडसाठी पण ते काही कमी पैसे घेत नाहीत. यात सुपरस्टार समजल्या जाणाऱ्यांपासून तर बऱ्यापैकी बस्तान बसवलेल्या स्तरापर्यंत जबरदस्त पैसे घेणाऱ्यांची यादी करता येईल. यातली काही नावे आणि त्यांच्या जाहिरातीची फी यांची आज माहिती करून घेऊ.

१) शाहरुख खान

शाहरुखचे सिनेमे गेले ३ वर्षं आले नसले तरी त्याला जाहिरातींची कमतरता नाही. बायजू या जगात सर्वात वेगाने वाढणाऱ्या एज्युटेक कंपनीचा तो ब्रँड अँबेसेडर आहे. सोबतच रिलायन्स जिओ, ह्युंदाई यांच्याही जाहिराती तो करतो. यासाठी तो ५- १० कोटी इतकी आकारणी एका ऍडसाठी करतो.

२) सलमान खान

बॉलीवूडचा हा भाई दरवर्षी एकतरी ब्लॉकबस्टर देऊन जातो. याचसाठी त्याची फॅन फॅलोईंग आजही कमी नाही. डिक्सी स्कॉट, थम्स अप, सुझुकी अशा ब्रँडचे काम त्याच्याकडे आहे. तो देखील ४ - १० कोटींदरम्यान फी घेत असतो.

३) अक्षय कुमार

अक्षय कुमार सध्या विमलची ऍड केली म्हणून वादात सापडला होता. पण विमलव्यतिरिक्त इतर अनेक ब्रॅंडच्या जाहिराती करताना तो दिसतो. होंडा, पॉलिसी बाजार, हार्पिक, टाटा मोटर्स अशा अनेक कंपन्या त्याचाकडे ऍडसाठी येत असतात. अक्षय एका ऍडसाठी ८-१० कोटी इतकी भरभक्कम रक्कम आकारतो.

४) आमीर खान

आमीरचे सिनेमे जसे आऊट ऑफ द बॉक्स असतात, तशाच त्याच्या जाहिरातीही असतात. त्याने केलेल्या अनेक जाहिराती लोक कित्येक वर्षे विसरत नाहीत. 'इसको लगा डाला, तो लाईफ झिंगालाला' हे त्याचे एक उदाहरण. फोन पे, टाटा स्काय, विवो अशा कंपन्यासाठी तो ऍड करताना दिसतो. यासाठी तो ५-७ कोटी आकारत असतो.

५) प्रियांका चोप्रा.

सध्या लग्न करून विदेशात संसार थाटलेल्या प्रियांकाबाई ऍडसाठी फी आकारण्याच्या बाबतीत खान मंडळींना टक्कर देतात. बम्बल, गार्नीअर, ॲप्पी फिज अशा ब्रँड्ससाठी ऍड करताना प्रियंका चोप्रा ४-१० कोटी इतकी फी घेत असते.

६) दीपिका पदुकोण

दीपिकाकडे आजच्या घडीला अतिशय मोठया आणि प्रसिद्ध ब्रँड्सच्या ऍडस् आहेत. यात पेप्सी, आदिदास, नेस्ले, ॲक्सिस बँक, लॉरियल पॅरिस, अशा तगड्या ब्रँड्सची कामे असताना कुणाला वेळ देऊ आणि कुणाला नको असे ठरवणे जड जाते. सहाजिक मग अशावेळी फीमध्ये घसघशीत वाढ होते. दीपिका पदुकोण एका ऍडसाठी ७-१० कोटी घेते.

७) करीना कपूर

दोन मुलांची आई झालेली करीना अजूनही रसिकांच्या मनावर राज्य करत आहे. लक्स साबण आठवला तर सर्वात आधी करीना आठवते. तसेच लॅकमे, प्युमा, कोलगेट, अशा कंपन्यांची जाहिरात करीना करते. यासाठी ती ३-४ कोटी रुपये आकारते.

८) अमिताभ बच्चन

महानायक अमिताभ बच्चन वय झाले तरी अजूनही मागे हटत नाही. सिनेमे आणि ऍडसमध्ये तो नेहमीच दिसतो. कॅडबरी डेरी मिल्क, कल्याण ज्वेलर्स, डाबर, इमामी असे ब्रँड्स त्यांच्या ऍडसाठी अमिताभ बच्चनला सोबत घेत आहेत. या सर्वांनकडून एका ऍडसाठी अमिताभ ३ - ८ कोटी घेत असतो.

९) कतरिना कैफ

नुकतेच लग्न करून संसार थाटलेल्या कतरिनाची स्लाइस या मँगो ज्यूसच्या ऍडमधील अदा करोडो पोरांना घायाळ करत असते. सोबत लेन्सकार्ट, रिबॉक, लक्स यांच्या ऍडमध्येही ती दिसते. यासाठी ती ५ -१० कोटी घेत असते.

१०) आलिया भट

आलिया भट आपल्या भन्नाट ऍक्टिगसाठी आणि नव्या पिढीतील दमदार अभिनेत्री म्हणून ओळखली जात आहे. फ्रुटी, मान्यवर, फ्लिपकार्ट, मेकमायट्रिप अशा डझनभर ब्रँड्सची ऍड ती करते. यासाठी १ -३ कोटी इतके रुपये ती घेते.

११) रणवीर सिं

रणवीर सिंग हा आपल्या चित्रविचित्र कपडे आणि जबरदस्त सिनेमे या दोन वेगळ्या गोष्टींनी ध्यान आकर्षून घेत असतो. मेकमायट्रिप, ड्युरेक्स, चिंग्स नूडल्स यांच्यासाठी तो ऍड करतो. तो देखील ३-४ कोटीं दरम्यान फी आकारात असतो.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required