computer

चांदबीबीचा महाल म्हणून ओळखली जाणारी ही देखणी वास्तू नक्की आहे तरी काय?

२८ मे हा अहमदनगर म्हणजे आपल्या नगर जिल्ह्याचा स्थापना दिन. या दिवशी जवळजवळ ५३० वर्षांपूर्वी, म्हणजेच १४९० साली अहमदनगरची स्थापना झाली. अहमदनगर आणि आसपासच्या भौगोलिक परिसरात अनेक ऐतिहासिक वास्तू बहामनी, निजामी अशा वेगवेगळ्या सत्तांची साक्ष आहेत.

चांदबीबी विजापुरची आदिलशाही व अहमदनगराची निजामशाही या दख्खनेतल्या साम्राज्यांची राज्यपालक राणी होती.

तसं तिला चांद सुलताना, चांद खातून अशा अनेक नावांनी ओळखलं जातं.

चांदबीबीने विजापूर व अहमदनगरच्या राज्यांचे रक्षण करण्याचे काम केलं. मात्र तिला मुख्यत: अहमदनगरमध्ये सम्राट अकबराच्या मुघल सैन्याशी झालेल्या लढाईमुळे ओळखलं जातं.
 

आज आम्ही चांदबीबीचा महाल या नावाने ओळखल्या जाणार्‍या वास्तूचे काही अप्रतिम फोटो तुमच्यासमोर ठेवत आहोत.

पण ते फोटो बघण्यापूर्वी एक महत्वाची सूचना : चांदबीबीचा महाल या नावाने म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू प्रत्यक्षात सलाबतखान(दुसरा) याचे थडगे आहे.
आज आपण या फोटोतून त्या काळच्या वास्तूकलेचा आनंद घेऊ या .   
 

या वास्तूचे बांधकाम असे आहे

एखाद्या मनोर्‍यासारखी उभी असलेल्या या इमारतीचा घेर १२ फूट आहे. त्याचे डिझाईन अष्टकोनात आहे. सत्तर फूट उंचीच्या या मनोर्‍याला आतून चारी बाजूने गॅलरी आहे. वर जाण्यासाठी पायर्‍या भिंतीच्या आतूनच आहेत. हा परिसर पावसाळ्यात फारच सुंदर दिसतो.

तुम्ही कधी इथं भेट दिली आहे? हो? मग वाट काय पाहता, तुम्ही काढलेले फोटोही इथे कमेंटबॉक्समध्ये शेअर करा ना!!

या लेखाचे शब्दांकन बोभाटाचे आहे. 
सर्व छायाचित्रेआणि कॉपीराइट्स महेश भुसारी यांची आहेत. 

सबस्क्राईब करा

* indicates required