कटप्पाने ढिंच्याक पुजाला का मारलं ?

राव आजची एक गुड न्यूज आली हाय...’दारू दारू, सेल्फी मेने लेली आज’ असल्या भन्नाट गाण्यांनी आपल्या कानाचे बारा वाजवणारी ढिंच्याक पूजा आता युट्युब वरून तडीपार झाली हाय राव. एक नाय.. दोन नाय.. तर तिचे सगळे व्हिडीओ युट्युबवाल्यांनी काढून टाकलेत.

Image result for dhinchak pooja

तर झालंय असं की कटप्पा सिंग नावाच्या माणसाने ढिंच्याक पूजा विरोधात रिपोर्ट केल्यानंतर हे सगळे व्हिडीओ युट्युब वरून ताबडतोब उडवण्यात आले आहेत. पण या महाशयाने का बरं या बिचारीच्या विरोधात तक्रार केली असावी ?  तर एक तर्क असा की युट्युबच्या धोरणानुसार (privacy policy) जर कोणी तुमच्या परवानगी शिवाय तुमचा व्हिडीओ युट्युबवर अपलोड केला तर तुम्ही त्याविरोधात तक्रार करू शकता. कदाचित हा माणूस ढिंच्याक पूजाच्या व्हिडीओमध्ये कुठे तरी दिसला असावा. अर्थात या व्यक्तीचं खरं नाव कटप्पा नाही बरं का, वेगळचं काही तरी आहे.

मायला हे समजल्यानंतर आम्ही युट्युब वर धाव घेतली आणि बघितलं तर काय? ढिंच्याक पूजाचे सगळे व्हिडीओ गायब आहेत. फक्त एक व्हिडीओ दिसतोय तो म्हणजे ‘दिलो का शुटर...हें मेरा स्कूटर’ हे लेटेस्ट गाणं तिने पब्लिक डिमांडवर पेश केलं होतं.

या बातमीने अख्खी सोशल मिडिया हादरून गेली हाय. बेसुऱ्या लोकांसाठी कुठे तरी आशा पल्लवित होत असतानाच ही बंदी निषेधार्थ आहे !!!

सबस्क्राईब करा

* indicates required