पद्मावती भारतीय नव्हती ? वाचा पद्मावती राणी बद्दल या अज्ञात गोष्टी !!

पद्मावती सिनेमा रिलीज होणार म्हणून चांगलंच रान पेटलंय राव. “अल्लाउद्दिन खिलजी आणि राणी पद्मावती यांच्यात काही अक्षेपार्य दृश्य दाखवलीत तर संपूर्ण सिनेमागृह जाळून टाकू” असा दम ‘जय राजपुताना संघ’ नामक राजपूत सेनेने दिला आहे. या आधी देखील ‘राजपूत करणी सेनेने’ हाणामारीतून आपला विरोध दाखवला होताच. आता यात भर पडली आहे या नव्या पक्षाची !! असो....

पण मंडळी ज्या राणी ‘पद्मिनी’ उर्फ ‘पद्मावती’ बद्दल हा वाद सुरु आहे तिच्या बद्दल माहित नसलेली एक गोष्ट म्हणजे ती भारतीय नव्हती. मंडळी तुम्ही बरोबर ऐकलंत. ती भारतीय नव्हती !!

 

काय आहे पुरावा ?


स्रोत

तर, राणी पद्मिनी बद्दल एकमेव पुरावा म्हणजे ‘मल्लिक मोहम्मद जैसी’ लिखित ‘पद्मावत’ हे महाकाव्य. यात उल्लेख केल्याप्रमाणे राणी पद्मावती आणि राजा रतन सिंह यांचं लग्न स्वयंवर पद्धतीने झालं होतं. या स्वयंवरात एका योद्ध्याबरोबर जिंकल्या नंतरच पद्मावती बरोबर लग्न करता येणार होतं. आश्चर्य म्हणजे हा योद्ध दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः पद्मावती होती. या लढाईत जिंकल्या नंतर पद्मावती आणि रतन सिंह यांचं लग्न झालं.


स्रोत

पद्मावत उल्लेख केल्या प्रमाणे पद्मिनी ही ‘सिंहल’ द्वीपची राजकन्या होती. अनेक खंडात विभागलेल्या पद्मावत मध्ये ‘सात समुद्र खंड’ आणि ‘सिंहालद्वीप खंड’ असे दोन खंड आहेत. ज्यात वर्णन केल्या प्रमाणे रतन सिंहने समुद्र ओलांडून सिंहलद्वीप वरील राजकुमारी पद्मिनी बरोबर स्वयंवरात विवाह केला. याच सिंहल द्वीपचं नाव पुढे ‘सिलॉन’ झालं आणि आज हे द्वीप ‘श्रीलंका’ या नावाने ओळखलं जातं.


स्रोत

मंडळी हे एकमेव काव्य आहे जे पद्मावती आणि तिच्या भोवती तयार झालेल्या कथेचा पुरावा आहे....पण यात वर्णन केलेले काव्यात्मक प्रसंग आणि अलौकिक गोष्टी पाहता खरा इतिहास कोणता आणि कविकल्पना कोणती यात फरक करणं कठीण होऊन बसतं. शेवटी हे काव्य अल्लाउद्दिन खिलजीच्या मरणानंतर तब्बल २०० वर्षांनी लिहिलं गेलं त्यामुळे यात सत्य किती आणि असत्य यात शंकाच आहे.

काही इतिहासकारांच्या मते पद्मावती ही केवळ एक काल्पनिक पात्र आहे. शिवाय खुद्द ‘पद्मावत’ चा रचनाकार मोहम्मद जैसी याने शेवटी म्हणून ठेवलं आहे की ‘ही एक प्रतीकात्मक कहाणी आहे.’

 

(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.) 
©बोभाटा

सबस्क्राईब करा

* indicates required