'मुरंबा' बघून ट्रम्प तात्या झाले मिथिलावर फिदा...बघा हा व्हीडोओ !!!

काय हाय ना मित्रा, ट्रम्प तात्या झाल्येत मिथिला पालकरवर फिदा. अन त्यांनी पयली गाडी पकडून थेट पुण्याच्या मंगलामधी जाऊन ‘मुरंबा’ बघितलाय. पिच्चर बघून मुरंबापेक्षा मिथिलाच जास्त ग्वाड वाटली ना त्यांना. च्यायला मुरंबा त्यांना एवढा आवडलाय की त्यांनी बाहुबलीनंतर पुन्हा एकदा थेट मऱ्हाटीतून रिव्ह्यू दिलाय.
“भाजीत भाजी मेथीची, मिथिला माझ्या प्रीतीची” असला खतरनाक उखाणा तात्यांनी घेतल्यानंतर आपल्या सारख्या तरुण पिढीनं कुणावर लाईन मरावं असा प्रश्न पडलाय. अमेय वाघला तर तात्या विसरलेच.
आणखी काय बोल्ले आपले तात्या? व्हिडीओत बघा की राव !