गाढवाला हाताशी धरून सैतानाने गाव संपवलं !

एका माणसानं त्याचं गाढव  झाडाला बांधून ठेवलं होतंसैतानानी ते बघितलं आणि त्यानी त्या गाढवाला दोरी सोडून मोकळं केलं .
गाढव चरत चरत बाजूच्या एका  शेतात गेलं आणि त्यानी नुकत्याच लावलेल्या पिकाचा फन्ना उडवायला सुरुवात केली. 
ज्याचं ते शेत होतं त्या शेतकर्‍याच्या बायकोनी बंदूक काढली आणि गाढवाला मारलं .
गाढवाच्या मालकाला हे कळलं तेव्हा त्याने शेतकर्‍याच्या बायकोला गोळी घातली.
हे तिच्या नवर्‍यला कळलं तेव्हा त्यानी गाढवाच्या मालकाला गोळी घातली.
त्या गाढवाच्या मालकाच्या मुलांनी शेतकर्‍याला गोळ्या घातल्या .....
थोड्याच वेळात गावात दंगा उसळला आणि गाव जळून खाक झालं.

**
सैतानाला देवानी जाब विचारला.
विचारलं की "हे तू काय केलंस "
सैतान म्हणाला " मी कुठे काय केलं , मी तर फक्त गाढवाला मोकळं केलं "

गाव बेचिराख करण्यासाठी सैतानाला काहीच करावं लागलं नाही . त्यानी फक्त एक काडी टाकली आणि गाव संपलं !

***

लक्षात घ्या , समाजात असे अनेक काडी टाकणारे सैतान असतात. दंगा करण्याआधी त्यांना संपवा !!!

सबस्क्राईब करा

* indicates required