समाज व्यवस्था -सोशल ऑर्डर म्हणजे काय ?

तर मंडळी,भरपूर तूप ओतून  पुरणपोळ्या चापून खाऊन झाल्या असतील तर आता हे वाचाच !

घरात उरलेल्या दुधाला विरजण कोण लावतं ?

कोणाला काहीही पडली नसते  ! Nobody cares !  

लोणी घुसळून तयार आहे.हे फक्त घरातल्या मर्जीतल्या मोजक्या माणसांनाच कळतं.

गॅसवर तूप कढवत असताना बहुतेकजण घराच्या बाहेर काढता पाय घेतात,

पण नंतर रवाळ खमंग तूप जो तो आपल्या पोळीवर ओढून घेणारच असतो.

आणि.....

बेरी खाणाऱ्याला मात्र चमचाभर साखर टाकून 'बचकभर साखर खातो मेला !' 

असं ऐकून ना ऐकल्यागत करत ते पातेलं ' हा तुझ्या कर्माचा परिपाक आहे ' असं ऐकत  ऐकत घासून स्वच्छ करावं लागतं.

याला म्हणतात समाजव्यवस्था !

सबस्क्राईब करा

* indicates required