मोठ्या मनाचा खेळाडू!! युक्रेनच्या मुलांना रॉजर फेडरर करणार 'ही' मोठी मदत
टेनिस विश्वातील प्रसिद्ध खेळाडू खेळाडू रॉजर फेडररने शुक्रवारी एक (१८ मार्च) मोठी घोषणा केली आहे. बलाढ्य रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता. ज्यामध्ये युक्रेनचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर रॉजर फेडरर युक्रेन मधील मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलणार आहे. त्याच्या संस्थेतर्फे तो तब्बल ५ लाख डॉलर्सची (३.८ कोटी रुपये) देणगी देणार आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये २३ दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. सुमारे ६५ लाख लोक विस्थापित झाले आहेत. त्याच वेळी, ३२ लाखांहून अधिक लोक आधीच युक्रेन सोडून गेले आहेत.
युएन रिफ्युजी एजन्सीने (UNHCR) या आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले की, २४ फेब्रुवारीपासून रशियाने आक्रमण करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून जवळपास ३० लाख लोक युक्रेन सोडून गेले आहेत. ही संख्या देशाच्या लोकसंख्येच्या सुमारे ७ टक्के आहे. याबाबत ट्विट करत रॉजर फेडरर म्हणाला की, "युक्रेनमधील फोटो पाहून मी आणि माझ्या कुटुंबातील सदस्य खूप घाबरले आहेत. आम्ही शांततेसाठी उभे आहोत."
तसेच त्याने पुढे लिहिले की, "आम्ही युक्रेन मधील त्या मुलांना मदत करू ज्यांना मदतीची गरज आहे. जवळपास सहा दशलक्ष युक्रेनियन मुले शिक्षणापासून दूर आहेत. रॉजर फेडरर संस्थेतर्फे आम्ही ५ लाख डॉलर्स देणगी देऊ."
तसेच माजी जागतिक पहिल्या क्रमांकाचा खेळाडू आणि युकेचे राजदूत अँडी मरे यांनीही एक मोठी घोषणा केली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर तेथील मुलांना मदत करण्यासाठी, अँडी मरे २०२२ टेनिस स्पर्धेतील बक्षिसाची रक्कम दान करणार आहे.




