Facts about Ms Dhoni: एमएस धोनी बद्दल 'या' गोष्टी तुम्ही क्वचितच ऐकल्या असतील..

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कॅप्टन कूल म्हणून ओळखला जातो. त्याने आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आयसीसी टी -२० वर्ल्ड कप, वनडे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजय मिळवून दिला आहे. असा पराक्रम करणारा तो एकमेव भारतीय कर्णधार आहे. बोभाटाच्या या लेखात आम्ही तुम्हाला एमएस धोनीबद्दल अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्हाला क्वचितच माहीत असतील.

मोठे केस असण्यामागचं कारण काय?

एमएस धोनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात आपल्या फलंदाजीसह आपल्या हेअर स्टाइलमुळे चर्चेत असायचा. मात्र त्याला अशी हेअर स्टाइल करण्याची प्रेरणा कुठून मिळाली. हे खूप कमी लोकांना माहीत आहे. त्याने बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमच्या हेअर स्टाइलची कॉपी करत केस वाढवले होते. त्यामुळेच त्याने केस वाढवले होते.

क्रिकेटसह या खेळांमध्ये होती रुची..

एमएस धोनी उत्तम क्रिकेटपटू आहे. फलंदाजी आणि यष्टिरक्षण करण्यात त्याचा हात कोणीही धरू शकत नाही. मात्र तुम्हाला माहीत आहे का? एमएस धोनी सुरुवातीला फुटबॉल खेळात गोलकीपरची भूमिका पार पाडायचा. तसेच तो उत्तम बॅडमिंटनपटू देखील आहे. 

बाईक चालवण्याची आवड...

अनेकांना ही बाब माहीत असेल की, एमएस धोनीला बाईक चालवायला खूप आवडतं. त्याच्या बाईक कलेक्शनमध्ये एकापेक्षा एक महगड्या बाइक्स आहेत. मात्र तुम्हाला ही बाब माहीत नसावी की, एमएस धोनीने मोटर रेसिंगची एक टीम देखील खरेदी केली आहे.

पॅरा जंप करणारा पहिलाच खेळाडू...

एमएस धोनी हा पॅरा जंप करणारा पहिलाच खेळाडू आहे. त्याने आग्रा येथे असलेल्या भारतीय सैन्याच्या पॅरा रेजिमेंटमधून पॅरा जंपिंग केली होती. यासाठी त्याने ट्रेनिंगही घेतली होती.

सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू..

एमएस धोनी हा सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना त्याने कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्यापूर्वी तो वर्षाला १५०-१६० कोटी रुपयांची कमाई करायचा. 

काय वाटतं, असा कोणता भारतीय खेळाडू आहे जो पुढे जाऊन एमएस धोनीची जागा घेऊ शकतो? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required