computer

पुण्यात भरतोय जगातला पहिला टिक-टॉक फिल्म फेस्टीव्हल....कोण कोण जाणार ?

'पुणे तिथे काय उणे' ही म्हण किती खरी आहे हे पुणेकर वेळोवेळी सिद्ध करत असतात. आता पण एका अफलातून गोष्टीमुळे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पुण्यात दहीहंडी गणेशोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. दरवर्षी नवनवीन सेलेब्रिटी पुण्यात येत असतात. यावर्षी पण पुण्यात सेलेब्रिटी येतील पण यावेळचे आकर्षण थोडं वेगळे आहे राव!! मंडळी पुण्यात चक्क टिक टॉक फिल्म आयोजित करण्यात येत आहे. टिक टॉक वर आपल्या एक से बढ़कर एक विडिओंमुळे जे थेट तरुणाईच्या दिलात जाऊन बसले आहेत, असे टिक टॉक स्टार एकाच मंचावर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत.

मंडळी, फक्त एवढयावरच थांबले असते तरी चालले असते, पण हे शेवटी पुणे आहे. जे होईल ते भन्नाटच होईल नाही का? तर या टिक टॉक स्टार्स सोबत तुम्हाला चक्क विडिओ करण्याची संधी मिळणार आहे राव!! रितसर स्पर्धा ठेवण्यात आली आहे, आणि जिंकलेल्या स्पर्धकांना मोठमोठी बक्षीसे पण जाहिर करण्यात आली आहेत. 

साई जनसेवा प्रतिष्ठान आणि एनएस प्रॉडक्शन यांनी या टिक टॉक फ़िल्म फेस्टिवलचे आयोजन केले आहे. टिक टॉक स्टार्स बरोबर हिंदी आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक प्रमुख अभिनेते या इवेंटसाठी उपस्थित राहणार आहेत.

यास्पर्धेसाठी वेगवेगळ्या कॅटेगरी तयार करण्यात आल्या आहेत. तुम्हाला आवड़ असलेल्या कॅटेगरीतुन विडियो तयार करून आयोजकांना पाठवायचा आहे.

बेस्ट कॉमेडी, बेस्ट इमोशनल, बेस्ट सोशल, बेस्ट हॉरर, बेस्ट डांस, बेस्ट प्रेरणादायक, बेस्ट प्रांक, बेस्ट क्रिएटिव्ह, बेस्ट ऍक्शन, बेस्ट डायलॉग, बेस्ट पर्यावरण जागृती अशा त्या कॅटेगऱ्या आहेत मंडळी!!

विजेत्यांसाठी बक्षिसाची रक्कम पण मोठी ठेवण्यात आली आहे. पहिल्या आलेल्या स्पर्धकाला 33,333 रुपये, दुसऱ्या आलेल्या स्पर्धकाला 22,222, तर विभागात पहिल्या आलेल्या स्पर्धकाला 5,555 विभागात दुसऱ्या आलेल्या स्पर्धकाला 3,333 एवढे बक्षीस ठेवण्यात आले आहे. टिक टॉक रिकाम्या लोकांचे उद्योग आहे असे म्हटले जाते पण आता टिक टॉकमधून हजारो रुपये कमविण्याची संधी चालून आली आहे राव!!

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुमचे बेस्ट विडिओ आयोजकांना पाठवावे लागणार आहेत त्यातून बेस्ट परफॉर्मर्सची निवड करण्यात येणार आहे राव!! या माध्यमातून स्वतःचे कौशल्य सिद्ध करण्याची चांगली संधी आपल्या टिक टॉक गडींना चालून आली आहे.

मंडळी कदाचित देशात पहिला असा हा भन्नाट कार्यक्रम आयोजित केला जात आहे. एकाच छताखाली भारतातले सगळे टिक टॉक स्टार बघायला मिळणार आहेत. पुणेकर काय करतील याचा नेम नाही हेच खरे राव!!

 

लेखक : वैभव पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required