computer

दूरदर्शनवरचे यातले किती व्हिडिओज तुम्हांला आठवताहेत..? चौथं गाणं तर तुम्हांला तोंडपाठ असेल..

दूरदर्शनच्या काळात जास्त चॉईस नव्हता म्हणून कितीही आरडाओरड केली तरी आज सतत गळणार्‍या टीव्हीपेक्षा तेव्हाच्या कार्यक्रमांचा दर्जा चांगला होता हे कुणीही मान्य करेल. आठवड्यातून एकदाच येणार्‍या मालिका, चित्रहार, रंगोली आणि छायागीत, रविवारचे आणि सुटीचे कार्यक्रम हे सगळं मर्यादित असलं तरी छान होतं. दूरदर्शनवर दाखवली जाणारी राष्ट्रीय एकात्मतेवरची गाणीही तितकीच उत्कृष्ट होती. अजूनही कुणीतरी त्या गाण्यांचे व्हिडिओ व्हाटसऍपवर शेअर करतं आणि व्हिडिओ बघताना जाणवतं की अजून आपल्याला ती सगळी गाणी पूर्ण पाठ आहेत. 

’विविधतेतही एकता’ या भावनेने नटलेला आपला भारत देश. भाषा, प्रांत, संस्कृती या सगळ्यांत वेगळा आणि तरीही एका सूत्राने एकत्र बांधला गेलेला. आज चॅनेल्सच्या गर्दीत हरवून गेलेल्या या गाण्यांच्या आठवणी पुन्हा जाग्या करूयात..
 

भारतीय विजयज्योत

सुनील गावस्कर, वेंगसरकर , बिशनसिंग बेदी, प्रकाश पदुकोण, मिल्खासिंग अशी वेगवेगळ्या क्रीडाप्रकारातल्या खेळाडूंनी उंचावलेली विजयज्योत खरीच प्रेरणादायी आहे..  या व्हिडिओतले किती खेळाडू तुम्हाला माहित आहेत?

अनेकता में एकता

मोठं झाल्यानंतरही लहानपणीच्या ऍनिमिटेड फिल्म्स इतक्या आवडतील हे न पटण्यासारखं आहे. अपवाद, जुन्या दूरदर्शनच्या या फिल्म्स आणि टॉम ऍंड जेरी.. एक तितली, अनेक तितलियॉं.... "सूरज एक, चंदा एक, तारें अनेक.. ...." पाहा आणि ऐका हे गाणं पुन्हा एकदा... 

एकता का वृक्ष

वृक्षतोड करू नये हे शिकवता शिकवता आपसांत भांडू नये हे शिकवणारी ही फिल्म्स डिविजनची फिल्म खरंच सुंदर आहे..

मिले सूर मेरा तुम्हारा..

हे भारत देशाचं जणू दुसरं राष्ट्रगीत. देशभरातले सिनेकलाकार, सांगितिक कलाकार आणि खेळाडू यांच्यासोबत बनवलेला हा व्हिडिओ  भारतीय कधीच विसरणार नाहीत

बजे सरगम हर तरफसे गूंज बनकर देशराग

विविध क्षेत्रातल्या संगीत कलाकारांच्या साजाने सजलेलं  हे गीतही तितकंच अप्रतिम आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required