computer

नेटफ्लिक्स चक्क २ दिवसांसाठी फुकट उपलब्ध असणार आहे...तारीख बघून घ्या !!

लॉकडाऊन मध्ये लोकांचा सर्वात मोठा सहारा जर काय ठरले असेल तर ते म्हणजे वेबसिरिज. कधी नव्हे ते मोठ्या प्रमाणावर वेबसिरिज बघितल्या गेल्या. त्याआधी देखील वेबसिरिजचे मार्केट लहान नव्हते. आता तर ते अधिकच मोठे होत आहे. सध्याच्या घडीला या बाजारातील सर्वात मोठा खेळाडू म्हणजे नेटफ्लिक्स!! 

नेटफ्लिक्सने दर्जेदार सिरीज आणून आपला दबदबा राखला आहे. म्हणूनच नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन घेणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढत आहे. तर असे हे नेटफ्लिक्स ४८ तासांसाठी फुकटात उपलब्ध असणार आहे. या आठवड्याचा विकेंड हा फ्री नेटफ्लिक्सचा असणार आहे. 

४ डिसेंबर ही तारीख ज्यांच्याकडे अजूनही नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन नाही त्यांच्यासाठी मेजवानी ठरणार आहे. नेटफ्लिक्सने स्ट्रीमफेस्ट अंतर्गत ही सोय उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा देण्यामागे त्यांचा हेतू असा आहे की २ दिवस नेटफ्लिक्सवरील भन्नाट सिनेमे आणि सिरीज बघून लोकांनी पुढील काळात देखील नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन घ्यावे.

या स्ट्रीमफेस्टमुळे दोन दिवस नेटफ्लिक्सवर गर्दी पडेल हे मात्र निश्चित. नेटफ्लिक्स दोन दिवस मोफत स्ट्रीमिंग उपलब्ध करून देत आहेच या विकेंडला काय बघायचे याचे नियोजन आतापासून करून ठेवा...

सबस्क्राईब करा

* indicates required