'ई हाफ गर्लफ्रेंड होता क्या हे ?' तुम्हाला माहित आहे का ?

Subscribe to Bobhata

चेतन भगतच्या पुस्तकांवर आधारीत बरेच सिनेमे येऊन गेले. काही टुकार तर काही सहन होतील असे. आता त्यात आणखी भर म्हणजे त्याच्या ‘हाफ गर्लफ्रेंड या पुस्तकावर आधारित सिनेमा. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा एक टीझर लाँच करण्यात आला. या टिझरमध्ये अर्जुन कपूर चक्क भोजपुरी बोलताना दिसतोय. तो प्रेक्षकांना ‘ई हाफ गर्लफ्रेंड होता क्या हे ?’ असं विचारतोय. आता ही हाफ गर्लफ्रेंड कोण? तर आपल्या शक्तीची मुलगी श्रद्धा.

Image result for half girlfriend

या सिनेमातील माधव हे पात्र बिहारी आहे.त्यामुळं अर्जुन कपूरला बिहारी बोली शिकणं  भाग होतं.  यासाठी म्हणे त्यानं दहा दिवस बिहारमध्ये जाऊन भाषेची ट्रेनिंग घेतली आहे. ही मेहनत किती रंगलीये ते सिनेमा बघितल्यावर तसं कळेलच. या सिनेमाच्या निमित्तानं अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत.

‘मैत्रिणीपेक्षा जास्त आणि गर्लफ्रेंडपेक्षा कमी’ ही आहे या सिनेमाची टॅगलाईन. ही  वाचूनच तुम्हांला अंदाज येईल की सिनेमात नक्की काय असेल. आता दिग्दर्शक मोहित सुरी (भट कँपमधला) आहे म्हटल्यावर गाणी आली, रोमॅन्स आला, मसाला, फिल्मिगिरी आलीच. हे सर्व तुम्हाला आवडत असेल तर हा सिनेमा तुमचाच आणि तुमचाच.

सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांतच येणार आहे. चित्रपट १९ मे २०१७ ला रिलीज होतोय.

तर ‘कटप्पाने बाहुबलीला का मारलं’ या प्रश्नानंतर आता अजून एक नवीन प्रश्न "ई हाफ गर्लफ्रेंड होता क्या हे?" तुम्हाला माहित आहे का याचं उत्तर?

सबस्क्राईब करा

* indicates required