अमेरिकन विद्यापीठ भारतीय शेअर बाजारात !!!

गेल्या वर्षभरात अनेक अमेरिकन विद्यापीठांचा साठलेला पैसा भारतीय शेअर बाजारात येतो आहे.

विद्यापीठ आणि शेअर बाजारात ?   भारतीय विद्यार्थी अमेरीरित आणि  अमेरिकन पैसा मात्र भारतीय शेअर बाजारात?   हे जरा गोंधळात टाकणारं समिकरण वाटतंय  ना? 
जर आमच्या विद्यार्थ्यांनी भरलेले पैसे जर असे बाजारात संपले, तर पुढे काय ?  असा ही प्रश्न तुमच्या मनात उभा राहीला असेल. पण थांबा.. हे बाजारात येणारे पैसे आपल्या फियांचे नाहीत. ते आहेत एंडोवमेंट फंडचे पैसे.

काय असतो हा एंडावमेंट फंड?

अमेरिकन विद्यापीठांना अनेक संस्था, कंपन्या, दानशूर सधन व्यक्ती मोठमोठ्या देणग्या देत असतात. हे पैसे विद्यापीठाच्या भविष्यात येणार्या शैक्षणिक कार्यक्रमात वापरले जाणार असतात. मात्र अशा पद्धतीनं जमा झालेला निधी विद्यापीठ  एकाच वेळेस एकहाती खर्च करू शकत नाही. त्यांना मूळ मुद्दल कायम राखावं लागतं आणि  त्यावर मिळणारं व्याज किंवा हा निधी इतर पद्धतीने गुंतवून दर वर्षी चार ते पाच टक्केच खर्च करायचा असतो. त्यामुळे  हे पैसे कसे गुंतवावे हा त्यांच्यापुढचा यक्षप्रश्न असतो.  कारण अमेरिकेत व्याज दर अत्यंत कमी आहे आणि महागाईमुळे (इन्फ्लेशन) दर वर्षी मुद्दलात खोट येण्याची शक्यता असते. 
या समस्येचं एक उत्तर आता त्यांना भारतीय शेअर बाजारात मिळालंय. त्यांना भारतात गुंतवणूकीवर भरघोस परतावा तर मिळतोच  आणि  खेरीज पैसे पण सुरक्षित राहतात. अशी गुंतवणूक करण्याचे नियम मात्र अत्यंत कडक आहेत आणि ते कसोशीने पाळले जातात. सध्या तरी हे पैसे आय पी ओ म्हणजे नव्या पब्लीक इश्यू मध्येच गुंतवले जातात. गेल्या वर्षभरात अनेक नामांकीत  विद्यापीठांनी आपल्या बाजारात गुंतवणूक केली आहे, आणि भरपूर नफा कमावला आहे हे वेगळे सांगायला नकोच. 

एकट्या हार्वर्ड विद्यापीठाने केलेली गुंतवणूक बघा.

इंटरग्लोब एव्हिएशन  गुंतवणूक -  ५८ कोटी

अल्केम लॅब गुंतवणूक-२० कोटी

पीएन्बी हाउसींग  गुंतवणूक-१६ कोटी 

एचसीजी गुंतवणूक  ३० कोटी 

क्वेस कॉर्प गुंतवणूक १० कोटी 

या खेरीज अनेक इतर विद्यापीठे पण अशीच गुंतवणूक करत आहेत.

मग काय ठरलं तुमचं ?  आम्ही सोपा विचार केलाय.  जर एखादी कंपनी हार्वर्डला चांगली वाटत असेल तर आमच्यासाठी पण ती चांगलीच असेल.  नाही का ?

सबस्क्राईब करा

* indicates required