computer

जगातल्या सर्वात देखण्या पुरुषांची यादी प्रसिद्ध झालीय.यादीतला भारतीय पुरुष कोण असेल ? काही अंदाज ?

सौंदर्य म्हणले की स्त्रियाच डोळ्यांसमोर येतात. पण ही मक्तेदारी काही स्त्रियांचीच आहे असं नाही. पुरुषही सुंदर असतात, मोहक असतात. निसर्गाने पुरुषांना ही सौंदर्य बहाल केले आहे जे अनेकवेळा दुर्लक्षित केले गेले. जगातली सर्वात मोहक, हँडसम पुरुष कोणते असे विचारले तर पट्कन लक्षात येत नाही. म्हणून आज आपण जगातले टॉप हँडसम पुरुषांची यादी पाहूयात. आपल्या भारतातले एक नावही त्या यादीत आहे हे पाहून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. TheTealMango २०२१ मधल्या जगातील टॉप ७ सर्वात सुंदर पुरुषांची घोषणा केली आहे.

किम ता-ह्युंग (BTS V)

अवघ्या २५ वयाचा दक्षिण कोरियामधला हा हँडसम तरुण V या नावाने ओळखला जातो. किम हा दक्षिण कोरियन प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि अभिनेता आहे. तो संगीतकार म्हणून दक्षिण कोरियन बॉय बँड BTS चा एक भाग आहे. १३ जून २०१३ ला त्याने BTS चा एक कलाकार म्हणून पदार्पण केले. त्याचा पहिला सोलो अल्बम २ कूल ४ स्कूल होता. त्याने "नो मोअर ड्रीम" या गाण्याने त्याची कारकीर्द सुरू केली. ते गाणे खूप गाजले आणि जगभरात मुली त्याला फॉलो करू लागल्या. त्याचे इंस्टाग्रामवर ६.३ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याचे न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कसह जगभरात शोज झाले आहेत. इतका हँडसम मुलगा अजूनही सिंगल आहे बरं का!

हृतिक रोशन

नाम तो सुना ही होगा! या यादीतले एकमेव भारतीय नाव हृतिक रोशनचे आहे. त्याला भारतीय लोक प्रेमाने ग्रीक गॉड म्हणतात. त्याचा जन्म आहे १० जानेवारी १९७४चा. एक मॉडेल आणि अभिनेता म्हणून तो बॉलिवूड चित्रपटांमध्ये सुपरस्टार आहे. २००० मध्ये 'कहो ना प्यार है' या चित्रपटाद्वारे सर्वात यशस्वी बॉलीवूड पदार्पण केले. त्यांनतर कभी खुशी कभी गम, कोई मिल गया, क्रिश, धूम ३,बँग बँग यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये तो दिसला आहे. घारे हिरवे डोळे, ६ पॅक्स, मनमोहक नृत्य, त्याला फक्त एकदा बघायला अनेकदा सिनेमे पाहिले जातात. तो बॉलीवूड उद्योगातील सर्वात श्रीमंत मॉडेलदेखील आहे. बायकोशी घटस्फोट झाल्यामुळे तोही सध्या सिंगल आहे. TheTealMango ने हृतिक रोशनला जगातील दुसरा सर्वात देखणा माणूस म्हणून घोषित केले आहे.

रॉबर्ट पॅटिनसन

३५ वर्षीय रॉबर्ट पॅटिनसन हा युनायटेड किंगडममधील देखणा अभिनेता आहे. रॉबर्ट डग्लस थॉमस पॅटिनसन हे त्याचे पूर्ण नाव! त्याचा जन्म आहे १३ मे १९८६चा. वयाच्या १५ व्या वर्षी त्याने लंडन थिएटर क्लबमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली. पॅटिन्सनने २००५ मध्ये फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. ब्लॉकबस्टर चित्रपट हॅरी पॉटर आणि द गॉब्लेट ऑफ फायरमध्ये सेड्रिक डिगोरी म्हणून, तसेच ट्वायलाइट सागा मालिकेमुळे तो जगभर प्रसिद्ध आहे. अभिनय तर तो करतोच, पण गिटार आणि कीबोर्डही मस्त वाजवतो. काही चित्रपटांसाठी तो गाणेही गायला आहे. २०२१ मध्ये त्याचा जगातील तिसरा देखणा पुरुष म्हणून नंबर लागतो.

ब्रॅड पिट

अमेरिकेतला प्रसिद्ध अभिनेता 'ब्रॅड पिट' हे कोणाला माहित नसेल? हे नाव आजही तरुणींना भुरळ पाडतं. त्याचे खरे नाव विल्यम ब्रॅडली पिट आहे. आता त्याचे वय ५७ वर्ष आहे. त्याचा जन्म १८ डिसेंबर १९६३ अमेरिकेत झाला. त्याने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०२० मध्ये 'वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड’ या चित्रपटासाठी बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर श्रेणीत त्याने मानाचा ऑस्कर जिंकला आहे. ए रिव्हर रन्स थ्रू इट, लेजेंड्स ऑफ द फॉल आणि इंटरव्ह्यू विथ द व्हॅम्पायर या हॉरर थ्रिलर मध्ये त्याने काम केले आहे. वयाच्या विसाव्या वर्षी २००३ पासून त्याने करिअरला सुरुवात केली. त्याचे दोनदा लग्न झाले होते; २००० मध्ये पहिल्यांदा जेनिफर ॲनिस्टनशी भेट झाली, पण चार वर्षांनंतर ते वेगळे झाले. नंतर २०१४ मध्ये जगातील सर्वात सुंदर महिला अँजेलिना जोलीशी लग्न केले आणि दोन वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला. वय झाले असूनही तो आजही तितकाच देखणा दिसतो .

टॉम क्रूझ

या यादीतले सर्वात तरुण नाव, वय वर्ष फक्त ५९! अमेरिकेन अभिनेता टॉम क्रूझ हा पूर्ण जगातल्या मुलींच्या गळ्यातल्या ताईत आहे. त्याचे पूर्ण नाव थॉमस क्रूझ मॅपोथर IV आहे. त्यांचा जन्म ३ जुलै १९६२ रोजी न्यूयॉर्कमधे झाला. १९८० च्या दशकाच्या सुरुवातीस त्यांनी विनोदी चित्रपट रिस्की बिझनेस (१९८३) आणि अॅक्शन ड्रामा चित्रपट टॉप गन (१९८५) मधील प्रमुख भूमिकांसह आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आतापर्यंत त्याने तीन गोल्डन ग्लोब्स आणि तीन अकादमी पुरस्कार नामांकनांसह अनेक पारितोषिके जिंकली आहेत. तो जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. टॉम क्रूझ अनेक वर्षांपासून जगातील सर्वात सुंदर पुरुषांच्या यादीत अव्वल स्थान मिळवत आहे. त्याचे मोहक हास्य आणि अभिनय पाहून जगभरातल्या तरुणी त्याच्या चित्रपटांची वाट पाहत असतात.

ओमर बोरकान अल गाला

हे चित्रपट क्षेत्राच्या बाहेरचे नाव असले तरी याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. इराकचा हँडसम हंक ३१ वर्षाचा आहे.ओमर बोरकान अल गाला याचा जन्म बगदाद, इराक येथे २३ सप्टेंबर १९८९ रोजी झाला. तो कवी, मॉडेल, अभिनेता, ऑनलाइन सेलिब्रिटी आणि छायाचित्रकार आहे.
इंटरनॅशनल प्रेसने त्याला जगातील सर्वात सुंदर अरब माणूस म्हणून लेबल केले आहे. त्याचे तांबूस डोळे आणि आकर्षक चेहरा त्याला या यादीत ६ व्या नंबरवर आणतात. तो मध्य पूर्वेतील सर्वात आकर्षक पुरुष आहे.

ख्रिस इव्हान्स

कॅप्टन अमेरिका म्हणलं की आठवतो तो हा देखणा अभिनेता! मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स (MCU) चित्रपटांच्या मालिकेत ४० वर्षीय ख्रिस इव्हान्स कॅप्टन अमेरिका म्हणून जगभरात पोहोचला. या अमेरिकन अभिनेत्याचा जन्म १३ जून १९८२ रोजी बोस्टन, मॅसॅच्युसेट्स, येथे झाला. त्याने २००० मध्ये ओपोजिट सेक्स सारख्या टेलिव्हिजन शोमध्ये अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली. इव्हानने २०१७ मध्ये गिफ्ट नावाच्या ड्रामा फिल्ममध्ये, २०१९ मध्ये नाइव्हज आउट नावाच्या मिस्ट्री फिल्ममध्ये काम केले आहे. तो एक हँडसम , देखणा अभिनेता आहेच तसेच त्याला विनोदाची उत्तम जाण आहे. अनेक मुलाखतींमधून त्याचा हरजबाबीपणा आणि खेळकर स्वभाव तरुणींना भुरळ पाडून गेला आहे.

अँट-मॅन पॉल रड :यावर्षीचा सर्वात सेक्सी पुरुष

आता ही यादी सोडा. फ्रेंड्समधल्या फीबीचा नवरा आणि आपला अँट-मॅन पॉल रडला PEOPLE's 2021 ने जगातला यावर्षीचा सर्वात सेक्सी पुरुष हा किताब बहाल केलाय. या अमेरिकन अभिनेत्याचं आजचं वय आहे ५२ वर्षे!! आणि या उपाधीने त्याला आणि त्याच्या बायकोलाही बुचकळ्यात टाकलंय असं त्याचं म्हणणं आहे.

असो. या जागतिक यादीत एकच भारतीय नाव आले आहे. जर अशी फक्त आणि फक्त देखण्या भारतीय पुरुषांची यादी करायची तर तुमच्यालेखी त्या यादीत कोण कोण असेल?

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required