computer

मनी हाईस्टचे गाणे ऐकले होते? आता मराठी 'खास रे' चे खास गाणे ऐकाच!

कोविडचे थैमान आटोक्यात आले आहे तरी ते संकट पूर्णपणे संपले नाही. अजूनही लसीकरण पूर्ण झाले नसल्याने सगळ्या माध्यमातून लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जितक्या लवकर लसीकरण पूर्ण होईल जनजीवन पूर्ववत होण्यास मदत होणार आहे. यासाठीच मराठीत एक नवे भन्नाट गाणे आले आहे. मनी हाईस्ट या  वेबसिरीज मधले ‘बेला चाओ’ हे गाणं खूप प्रसिद्ध झालेलं आहे. आता याच गाण्याची चाल घेऊन ‘खास रे टीव्ही’ या युट्युब चॅनेलने ‘लस घ्या’ हे जनजागृतीसाठी खास गाणं तयार केलं आहे. हे गाणं इतकं गाजतंय की सगळीकडे याचीच धूम आहे. तुम्ही हे ट्रेंडिंग गाणं पाहिलंय का?

नेटफ्लिक्सच्या सर्वाधिक गाजलेल्या वेब सीरिजपैकी एक असणाऱ्या ‘मनी हाइस्ट’ला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. त्यातले ‘बेला चाओ’ गाणं  पहिल्या सिझनमध्ये  पहिल्यांदा तुम्हाला ऐकायला येतं. या  गाण्यात प्रोफेसर कोणत्याही गोष्टीला कसा सामना करायचा हे शिकवतात. हीच प्रसिद्ध थीम घेऊन मराठीत गाणं करायचे ठरले. या गाण्याच्या चालीवर तयार केलेलं गाणं आपल्याला करोनाची लस घेण किती महत्त्वाचं आहे हे शिकवतं. “तिसऱ्या लाटेची घोषणा झाली, लस घ्या.. लस घ्या…” असं या गाण्याची सुरुवात होते. या व्हिडीओमधल्या कलाकरांनी  ‘मनी हाइस्ट’ सिरीजमधील लूकही धारण केला आहे. त्यांनी  लाल रंगाचे जम्पसूट आणि मनी हाइस्टमधला प्रसिद्ध मास्क घातला आहे.  हातामध्ये  धरलेल्या बोर्डवर मिम्स, घोषणा लिहिल्या  आहेत. फक्त २.३० मिनिटांचे हे गाणे आहे. या गाण्याचे शूटिंगही वेगवेगळ्या ठिकाणी केले आहे.

 

या व्हिडीओला आतापर्यंत ४ दिवसांत ५ लाखाहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि ७० हजारापेक्षा जास्त लोकांनी या गाण्याला आवडले आहे असे कळवले आहे. कमेंट्स करून कौतुक केले आहे. या गाण्याचा उद्देश नक्कीच चांगला आहे. तुम्हाला कसे वाटले हे गाणे?

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required