computer

सर्वाधिक कमाई करणारे ५ युट्युबर्स....यातले किती चॅनल्स तुम्ही पाहिले आहेत ?

सुरुवातीला मनोरंजन आणि नंतर कमाईचे साधन म्हणून युट्युब उत्क्रांत होत गेलं. आता तर पूर्णवेळ करियर म्हणून देखील कित्येक लोक हे युट्युबवर व्हिडीओ पोस्ट करत असतात. युट्युबच्या माध्यमातून कमाई करणाऱ्यांची यादी नुकतीच फोर्ब्सकडून जाहीर करण्यात आली. या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या युट्युबरचे वय ऐकून कुणाला पण आश्चर्याचा धक्का बसेल. युट्युबच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणारा युट्युबर आहे, रेयॉन काजी!!!   

रेयॉन काजीने १ जून २०१९ ते १ जून २०२० या एका  वर्षात २२० कोटी रुपये कमाई काढली आहे. या पठ्ठ्याचं वय फक्त 9 वर्ष आहे. अवघ्या ९ वर्षांच्या वयात युट्युबवर व्हिडीओ बनवून तो अब्जाधीश झाला आहे. विशेष म्हणजे सलग तिसऱ्या वर्षी तो सर्वाधीक कमाई करणारा युट्युबर ठरला आहे.

रेयॉनच्या चॅनेलचे नाव रेयॉन्स वर्ल्ड असे आहे. २०१५ साली ५ वर्षांचा असताना त्याने हे चॅनल सुरू केले होते. रेयॉन आपल्या चॅनलवर खेळणे आणि इतर गोष्टींचे अनबॉक्सिंग करत असतो. सध्या या लहानग्याने तब्बल ४.१७ कोटी सबस्क्रायबर आहेत.

रेयॉनच्या खालोखाल आणखी ४ जणांना सर्वाधिक कमाई करणाऱ्या युट्युबर्सच्या यादीत स्थान मिळालं आहे. त्यांचीही ओळख करून घेऊया.

दुसरा क्रमांक लागतो तो, जिमी डोनाल्डसन याचा. हा भाऊ 'मिस्टर बीस्ट' म्हणून प्रसिद्ध आहे. याचे व्हिडीओ हे स्टंटसने भरलेले असतात. त्यात ह्युमरचा तडका मारलेला असल्यामुळे त्याचे व्हिडीओ चांगले चालतात. गेल्यावर्षी त्याने स्वताला बर्फात भरून घेतले होते. सध्या त्याचे ४.७ कोटी सबस्क्रायबर आहेत तर कमाई ही वर्षाला २.४ कोटी डॉलर एवढी आहे.

तिसऱ्या नंबरवरील ‘ड्युड परफेक्ट’ चॅनेल हे पाच मित्रांकडून चालवले जाते. यात बॉबी कॉटन, कोरी कॉटन, गॅरेट हिलबर्ट, कोडी जॉन्स आणि टायलर टोनी यांचा समावेश आहे. हे आपल्या चॅनेलवर लाईटसबेर्स, नेर्फ गन्स, पेंटबॉल्स यांच्या सोबत खेळण्याचे वीडिओ टाकत असतात,फनी व्हिडीओ या कॅटेगरीत त्यांचे व्हिडीओ मोडले जाऊ शकतात. त्यांचे तब्बल ५.७ कोटी सबस्क्रायबर असून २.३ कोटी डॉलर एवढी कमाई आहे.

चौथ्या क्रमांकावर आहे 'र्हेट अँड लिंक' चॅनल. र्हेट जेम्स आणि चार्स लिंकन यांच्याद्वारे चालवले जात आहे. त्यांचे चॅनेल हे एका अर्थाने कॉमेडी चॅनेल आहे. ४.१८ कोटी डॉलर एवढे त्यांचे सबस्क्रायबर आहेत. तर एका वर्षात त्यांची कमाई ही २ लाख डॉलर एवढी आहे.

पाचव्या क्रमांकावर मार्कप्लायर नावाचा चॅनेल आहे. मार्क फिशबॅच यांचे ते चॅनेल आहे. गेल्या 8 वर्षांपासून या चॅनेलवर व्हिडीओ गेम्स संबंधी व्हिडीओ टाकले जात आहेत. त्यांचे देखील २.७ कोटी सबस्क्रायबर असून १.९ कोटी डॉलर्स एवढी त्यांची कमाई आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required