हजारो इंटरनेट युझर्सना या ओंडक्यांमध्ये सापडेना झालीय एक मांजर..

नजरेचे खेळ सगळ्यांनाच आवडतात. इंटरनेटवर तर त्यांचा भरणाच असतो. गेल्या आठवड्यात एका बिल्डिंगच्या खिडकीत लपलेल्या घोड्याच्या चित्राने धुमाकूळ घातला होता. या आठवड्यात ही संधी लाकडांच्या ओंडक्यात लपलेल्या एका मांजराला मिळालीय. म्हणे हे आळशी मांजर या लाकडांमध्ये कुठेतरी झोपलंय. 

शोधा बरं या मांजराला आणि कमेंटसमध्ये सांगा ते कुठं लपलंय ते. अजूनही नाही सापडलं?

पाहा बरं निरखून...

.

.

.

.

.

.

ओंडक्यांच्या दुसऱ्या राशीत सगळ्यात वरच्या ओंडक्यावर झोपलीय पाहा कशी मनीमाऊ ते...

सबस्क्राईब करा

* indicates required