computer

ग्राहक काबीज करण्यासाठी जिओचा आणखी एक नवा प्रयत्न-जिओचा 'परवडेबल' स्मार्टफोन येणार !!

जिओचा स्मार्टफोन येणार याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केल्यापासून लोकांना या फोनची उत्सुकता लागून राहिली होती. आता या फोनची उत्सुकता संपणार आहे. रिलायन्सचा जिओ स्मार्टफोन लाँच झाला आहे.

जिओ स्मार्टफोन्स किंमतीच्या बाबतीत परवडेबल असतील हे आधीच सांगण्यात आले होते. आता मात्र या फोनची किंमत पण समोर आली आहे. ६,४९९ रुपये या किंमतीत हा फोन विकला जाणार आहे. यात मात्र सुरुवातीला १,९९९ सुरुवातीला भरून बाकीचे पैसे इएमआय करून १८ किंवा २४ महिन्यांत भरू शकतात.

 

४ नोव्हेंबरपासून हा स्मार्टफोन जिओस्टोर्सवर उपलब्ध असणार आहे. पण यासाठी आधीच जिओच्या वेबसाईटवर नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. हा मोबाईल बेसिक लेव्हलचा स्मार्टफोन आहे. यात प्लास्टिक बॉडी, सिंगल कॅमेरा युनिट, फ्लॅश, स्पीकर जाळी असे फीचर्स असतील.

हा मोबाईल निळा आणि काळा या दोन रंगांमध्ये मिळू शकणार आहे. ५.४५ इंच एचडी स्क्रीन ७२०×१४४० रिझोल्युशनसह मिळणार आहे. जिओफोन नेक्स्टमध्ये १३ मेगापिक्सलचा कॅमेरा असेल, त्यात फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सलचा असणार आहे. सोबतीला नाईट मोड, एचडीआर मोड, पोर्ट्रेट मोड असेल.

प्रोसेसरच्या बाबतीत म्हणायचे तर तो स्नॅपड्रॅगन २१५ आहे. तर स्टोरेज हे २ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल मेमरी असणार आहे. इंटर्नल स्टोरेज ५१२ जीबी पर्यन्त वाढवता येऊ शकेल. ३५०० mAh ची बॅटरी आणि प्रगती ओएस नावाच्या अँड्रॉइडवर हा मोबाईल चालणार आहे.

ड्युयल सिम, वायफाय, ब्ल्यूटूथ, जीपीएस, एलटीइ, हेडफोन जॅक, चार्जिंगसाठी मायक्रो यूएसबी पोर्ट या अँड्रॉइड फोन्समध्ये असणाऱ्या गोष्टी इथे पण असणार आहेत.
तुम्हीही जिओ फोन्सची वाट पाहात होता का? उत्तर हो असेल तर पटापट बुकिंग करुन टाका..

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required