मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्सचे कान्स महोत्सवाच्या रेड कार्पेटवर अनवाणी आगमन?

2 मिनिट वाचन
शेअर करा:
अभिनेत्री  ज्युलिया रॉबर्ट्सचे कान्स महोत्सवाच्या रेड कार्पेटवर अनवाणी आगमन?

सध्या चर्चा चालू आहे कान्स महोत्सवाची. ऐश्वर्या, सोनम, मलिका शेरावतचे लूक्स, कपडे या चर्चाही सगळीकडे दिसत आहेत. अशा या बहुचर्चित आणि  जिथे फॅशनशिवाय पान हलत नाही अशा कार्यक्रमात एक आश्चर्य घडले. या कान्स चित्रपट महोत्सवात अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्सचे सुंदर काळा गाऊन आणि पाचूचा नेकलेस घालून आगमन झाले. पण जेव्हा तिने पायर्‍या चढायला सुरूवात केली, तेव्हा तिचे अनवाणी पाय दृष्टीस पडले. 

ज्युलिया रॉबर्ट्सने असे का केले?

कान्स चि‍त्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठीच्या पोषाखांचेही काही संकेत आहेत. स्त्रियांसाठीची नियमावली आणखीच मोठी आहे. पुरूषांनी काळा टक्सिडो , बो टाय आणि शूज तर  स्त्रियांनी उंच टाचांचे बूट व ड्रेस - पाश्चात्य पद्धतीचा पार्टी ड्रेस - घातलेच पाहिजेत असा एक नियम त्यात आहे. त्यातही स्टिलेटोज म्हणजे पेन्सिलसारखी पातळ आणि  किमान साडेतीन इंच उंचीची टाच असणार्‍याच चपला घालणे अनिवार्य आहे. गेल्या वर्षी ’कॅरोल’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळेस जवळजवळ पन्नास स्त्रियांना या कारणासाठी प्रवेश नाकारण्यात आला. त्यातल्या काहीजणींना वयोमानानुसार अशा चपला घालणॆ शक्य नव्हते.  त्यापूर्वीही प्लॅटफॉर्म हिल्स घातल्यामुळे स्त्रीकलाकारांना सुरक्षारक्षकांनी कार्यक्रमात येऊ दिल्या न गेल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्यावर्षीच्या घटनेचा मिडियामध्ये खूप निषेध झाला होता.

या नियमांना झुगारून देत ज्युलिया रॉबर्टसने या वर्षी चपलांनाच फाटा देऊन अनवाणी चालणंही किती आरामदायक असतं हेच दाखवून दिलंय. २१व्या शतकातही स्त्रियांकडे एक सुंदर शोभेची बाहुली म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन आहे ही दुर्दैवाची बाब आहे. 

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

गोंधळ : महाराष्ट्राच्या मातीतील नाद ऑस्करच्या दिशेने
मनोरंजन

गोंधळ : महाराष्ट्राच्या मातीतील नाद ऑस्करच्या दिशेने

दिग्दर्शक संतोष डावखर यांचा 'गोंधळ' चित्रपट २०२७ च्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवडला गेला आहे.

१८ सप्टेंबर, २०२६

'जिंकू किंवा मरू'चा जयघोष आणि 'छोटा जवान': जेव्हा नागरिक सैनिक बनला!
मनोरंजन

'जिंकू किंवा मरू'चा जयघोष आणि 'छोटा जवान': जेव्हा नागरिक सैनिक बनला!

भारत-चीन युद्धानंतर देशवासीयांचे मनोधैर्य उंचावणारा 'छोटा जवान' चित्रपट आणि बालकलाकार सचिन-महेश कोठारे.

१५ ऑगस्ट, २०२६

लग्नात 'मौत'चं गाणं वाजवलं आणि पोलीस बापाने खाडकन थोबाडीत दिली!
मनोरंजन

लग्नात 'मौत'चं गाणं वाजवलं आणि पोलीस बापाने खाडकन थोबाडीत दिली!

बँडमध्ये वाजवताना खाल्लेला मार ते मराठी सिनेसृष्टीचे सुपरस्टार; दादा कोंडके यांच्या सुरुवातीच्या संघर्षाचा एक रंजक किस्सा.

८ ऑगस्ट, २०२६