पर्यावरण बदलासाठी रिकार्डोने जे केले ते बघून तुम्ही थक्क व्हाल.

Subscribe to Bobhata

पत्रिकेत अमुकतमुक योग आहे म्हणून पिंपळाच्या झाडाशी मुलीचे लग्न लावून नंतर सुयोग्य अशा मुलाशी मुलीचा पुनर्विवाह करणे असे काही प्रकार वर्तमान पत्रात आपण वाचतो. ’रिकार्डो टेरेस’ या नटाने वृक्ष आणि पर्यावरण संवर्धनासाठी चक्क सायप्रसच्या झाडाशी लग्न केले आहे.

लग्नासाठी रिकार्डो वाजत गाजत घरातून मिरवत बाहेर पडला.सुगंधी धूप जाळून , शंखध्वनींच्या घोषात त्याने वधूच्या बोटात म्हणजे वधूच्या एका डहाळीत  लग्नाची अंगठी घातली आणि वधूचे चुंबन घेतले. यावेळी लग्नासाठी जमलेले आप्त स्वकीय आणि इतरेजन या नव्या दांपत्यावर अक्षता टाकत होते.   आपल्या वृक्षवधूसाठी त्याने मेजवानीचा पण खास बेत आखला होता. .हा सोहळा पारंपारीक पध्दतीने पार पडल्यावर त्याने पर्यावरण आणि वृक्षसंवर्धनाचे भाषण ठोकले आणि विवाह संपन्न झाला.  


रिकार्डो टोरेसच्या वधूचे वय २००० वर्षे आणि वजन काही शेकडो टनात आहे त्यामुळे मधुचंद्राच्या रात्री तो वधूला उचलून घेणार नाही पण वैवाहिक जीवनाची सुरुवात तो वृक्षारोपणानी करणार आहे. 

सबस्क्राईब करा

* indicates required