आदिश केळुसकरचा 'कौल'-भिडला तर चित्रपट, भिनला तर विचित्रपट.

Subscribe to Bobhata

उद्या १८ नोव्हेंबरला आदिश केळुसकरचा "कौल" उद्या चित्रपटगृहात येतो आहे. ज्यांनी "मामी" फेस्टीवलला हा बघीतला नसेल त्यांची उत्सुकता आता शिगेला पोहचली असेल. मामी चित्रपटात "कौल"ला यंग क्रिटीक्स अ‍ॅवार्ड तर पुण्याच्या आंतराष्ट्रीय फेस्टीवल ज्युरींचा विशेष पुरस्कार मिळाले आहेत म्हटल्यावर या उत्सुकतेचे कारण आपण नक्कीच समजू शकतो.
या चित्रपटाच्या निर्मितीची कहाणी थोडी वेगळीच आहे. पुण्याच्या फिल्म इंस्टीट्युट मधून चक्क बाहेर पडून आदिशने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
चित्रपट म्हणजे आर्थिक धाडस आणि ते धाडस केले आहे आदिशच्या आईने आणि चिंटू सिंग यांनी. बोभाटासाठी दिलेल्या खास मुलाखतीत आदिशच्या आईने , उमा केळुसकर यांनी हे अगदी सविस्तर सांगीतले आहे.
निर्मितीचे  एक महत्वाचे अंग म्हणजे Human Resources. अगदी कमीतकमी रीसोर्सेस वापरून हा चित्रपट बनवला आहे पण त्याची कमी प्रेक्षकांच्या अनुभवाच्या आड येणार नाही.

   
सोबतच "बोभाटा"साठी दिलेल्या दृकश्राव्य निवेदनात आदिश म्हणतो आहे की " चित्रपटासाठी दिलेल्या पैशापेक्षा वेळ जास्त अमूल्य असतो. कुठलीही गृहीतकं मनात बांधून हा चित्रपट बघू नका . हा एक वेगळाच अनुभव आहे जो आतापर्यंत आपल्या वाट्याला आला नसेल . अर्थातच असा विश्वास ठेवण्यापेक्षा ट्रेलर बघा . असा ट्रेलर तुम्ही आजपर्यंत बघीतला नसेल आणि अर्थातच असा चित्रपटही तुम्ही बघीतला नसेल. "
रोहित कोकाटे, दिपक परब, सौदामिनी टिकले,मकरंद काजरेकर यांनी चित्रपटातील भूमिका साकारल्या आहेत.  चित्रपटाचा विषय वेगळा आहे. एका माणसाच्या हातून खून होतो आणि त्यानंतर त्याचे बदललेले आयुष्य इतक्या एका वाक्यात कथा सांगणे  शक्य नाही .

या चित्रपटाची निर्मिती कोकणाचे गूढ वातावरण तयार करून ((वापरून)  चित्रीत केला आहे असे ऐकल्यावर ताबडतोब "रात्रीस खेळ चाले" किंवा नारायण धारपांच्या "नातूचे आगार  "  सारखा असेल असा तर्क मनाशी धरून चित्रपट बघू नका ही एक सूचना आहे . असे वाटत असेल तर एकदा डोळे मिटून मेंदूला Re-boot मारा. काही चित्रपट सगळ्या कुटुंबानी एकत्र बघायचे असतात तर काही बायको किंवा मैत्रीणीसोबत तर काही चार यार दोस्तांसोबत बघायचे असतात. कोणाच्यातरी सोबत जाणे फार महत्वाचे आहे कारण या चित्रपटातून बाहेर पडताना कोणीतरी सोबत असावे असे नक्की वाटेल. अत्यंत वैयक्तिक मानसिक पातळीवर बघण्याचा हा अनुभव आहे. चित्रपटाची कथा गल्लाभरू नाही . हे आदिश केळुसकरचे रेडीओअ‍ॅक्टीव्ह केमीकल आहे . झपाटून जाल इतकेच आता सांगतो.

(एक मन की बात : आदिश सुप्रसिद्ध कवि महेश केळुसकरांचा मुलगा ! अर्थातच चित्रपट सर्वांगसुंदर असणार हे नक्की आहे )

सबस्क्राईब करा

* indicates required