computer

आता घरबसल्या शिका 'कथा-पटकथा-संवादलेखन'...लेखक म्हणून काम करू पाहणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी !!

"अरेच्चा! इथे असं झालं असतं तर?" 
"सिन जरा आणखी वेगळा हवा होता यार…" 
"डायलॉग मध्ये ही ओळ हवी होती." 
"मी असतो तर याचा क्लायमॅक्स वेगळा केला असता…"

खरं खरं सांगा मंडळी, एखादा सिनेमा किंवा मालिका किंवा वेबसिरीज पाहताना ही वाक्ये मनात येतात ना? मग आपल्याला असं वाटतं की याचे लिखाण करण्याची संधी मला मिळाली तर किती मस्त होईल! संधी असते मंडळी… नक्कीच असते! फक्त ती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. ती संधी तुम्हाला मिळावी म्हणून आम्ही एक महत्वाची माहिती आपल्याला सांगणार आहोत. 

सध्या आपण लॉकडाऊन मध्ये आहोत. दिवसरात्र घरातच बसून तुम्हीही कंटाळला असाल. टीव्ही, मोबाईल किती बघणार? मग अश्या वेळी काही नवीन शिकून घेतलं आणि त्याचा वापर भविष्यात अर्थार्जनासाठी केला तर? या काळात सिनेमासृष्टीची दारे आपल्यासाठी उघडली गेली तर? होय, असं होऊ शकतं. कारण तुमच्यासाठी आहे एक खास कार्यशाळा ज्यात तुम्ही ऑनलाइन पद्धतीने शिकू शकता 'कथा-पटकथा-संवादलेखन'. 

कोणत्याही मालिका/सिनेमा/वेबसिरीज साठी कथा पटकथा आणि संवाद लेखन हे अत्यंत महत्वाचे भाग असतात. सध्या मनोरंजन क्षेत्र इतक्या झपाट्याने वाढतं आहे की त्यात दर्जेदार लिखाण करू शकणाऱ्या लेखकांची मागणी सुद्धा प्रचंड वाढते आहे. त्याचा हिस्सा बनायला तुम्हाला आवडेल का? 

तर मग 'संवेदन रायटिंग अकॅडमी' घेऊन येत आहे मनोरंजन क्षेत्रात लेखक म्हणून येऊ पाहणाऱ्यांसाठी एक ऑनलाइन व्यासपीठ! ते शिकवतील कथा पटकथा आणि संवाद लेखन कसे करायचे, आणि ते ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने! 

संवेदनची 'ऑनलाइन लेखन कार्यशाळा' सुरू होतेय मंडळी...

यात पटकथा लेखन, कथा बीज कसे कुठून निवडावे? कथा, प्लॉट- सब प्लॉट अशी रचना कशी करावी? घटनांना रंजकता आणणारा क्रम कसा द्यावा? पात्र आणि त्यांचं भवताल कसे निर्माण करावे? पात्रांच्या आयुष्याचा प्रवास पटकथेत कसा फुलवावा? उत्कंठा वाढवणारे प्रसंग कसे लिहावे? कथेपासून कलाकृती घडवतानाचा अभ्यास आणि संवादाचा वावर किती कसा आणि कुठे करावा? इत्यादी विषय शिकवले जातील. 

त्यासोबतच, टीव्ही सिरियल ते वेब सिरियल्ससाठी पटकथा लेखन, पटकथा लेखनातील वेग वेगळे प्रवाह आणि पद्धती, लेखन प्रोड्युसर समोर सादर कसं करावं, प्रोड्युसरची भूमिका कशी असते, स्क्रिप्ट मध्ये प्रॉडक्ट प्लॅनिंग आणि त्याचे महत्व, मनोरंजन उद्योगाचे अर्थशास्त्र, आजचा चित्रपट आणि त्यासाठी पटकथा लिहितानाचा दृष्टिकोन, अवॉर्ड शो किंवा रियालिटी शोसाठीचे लेखन कसे करावे हे ही शिकवले जाईल. 

मस्त ना मंडळी? एवढं सगळं घरीच बसून शिकायला मिळत असेल तर आणखी काय हवं? पण हे सगळं शिकवणार कोण? तर या कार्यशाळेचे मार्गदर्शक असतील सिनेमाक्षेत्रातील अनेक दिग्गज लोक… ते तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन तर करतीलच, शिवाय अनेक उदाहरणं, भरपूर सराव, असाईनमेंट सुद्धा सोडवण्यात मदत करतील. 

पाहूया मार्गदर्शक कोण असणार आहेत...

अभिराम भडकमकर.

दिल्लीच्या एन एस डी मध्ये शिक्षण घेतलेले अभिराम भडकमकर हे पछाडलेला, खबरदार, आम्ही असू लाडके ते 'बालगंधर्व' ह्या व्यक्तिचित्राचे सर्व कंगोरे दाखवणाऱ्या चित्रपटाचे अतिशय अभ्यासू लेखक आहेत. अनेक नाटकं व मालिकांसाठी ही यांनी पटकथा लेखन केलेले आहे. ते कथा- पटकथा प्लॉट-सब प्लॉट, पटकथा लेखनातील टप्पे कॅरेक्टर आणि पटकथेतील कॅरेक्टरचा प्रवास ह्या बाबत मार्गदर्शन करतील.

चिन्मय मांडलेकर

दिल्लीच्या एन एस डी मध्ये शिक्षण आणि अनेक गाजलेल्या मालिका, दुनियादारी, कच्चा लिंबू सारखे चित्रपटांचे लेखक. ते पटकथेचे रूपांतरण ह्या विषयावर मार्गदर्शन करतील.

अरविंद जगताप

अरविंद जगताप यांनी तू ही रे, येरे येरे पैसा, येड्यांची जत्रा, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा, गोष्ट छोटी डोंगरएव्हढी अश्या गाजलेल्या चित्रपटांसाठी लेखन केले आहे. अरविंद जगताप सर चला हवा येऊ द्या या शो मधील पत्रांसाठी प्रसिद्ध आहेत आणि ते अनेक अवॉर्ड शोचे लेखक ही आहेत. 

सचिन दरेकर

सचिन दरेकर हे सात हजार पेक्षा जास्त मालिकांच्या एपिसोडसचे लेखक आहेत. त्यांनी झेंडा, कॅन्डल मार्च, मोरया सारख्या अनेक चित्रपटांचे लेखन केले असून सध्या एक थी बेगम ह्या सध्या गाजत असलेल्या वेबसिरीजचे लेखक-दिग्दर्शक आहेत. ते वेबसिरीयल व त्यासाठीचा दृष्टिकोन आणि लेखकाने आपल्या कलाकृतींना बाजापेठ कशी मिळवावी ह्यावर मार्गदर्शन करतील.

समीर विद्वांस

समीर विद्वांस आजच्या काळातील तरुणांना भावणाऱ्या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक आहेत. आनंदी गोपाळ, डबल सीट, वाय झेड हे त्याचे काही गाजलेले चित्रपट. समीर सर मार्गदर्शन करणार आहेत पटकथा लेखनातील विविध प्रवाह आणि आजचा सिनेमा ह्या विषयावर.

आणि एवढंच नाही तर काही सरप्राईज सेलिब्रिटींचे सुद्धा मार्गदर्शन मिळणार आहे बरं का मंडळी. 

तर कार्यशाळा दिनांक 21 एप्रिल ते 1 मे रोज सायंकाळ सहा ते आठ एक सत्र आणि त्यात एक असाईनमेंट अश्या स्वरूपाची असेल. तुमची असाईनमेंट तपासून त्यावर लिखित स्वरूपात वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल. कार्यशाळेच्या नोट्स म्हणून काही नमुना पटकथा ही दिल्या जातील.

यात तुम्ही लाइव्ह किंवा तुमच्या सोईच्या वेळेप्रमाणे शिकू शकाल. कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रा नंतर सात दिवस तुम्ही हे व्हिडिओ परत परत ही पाहू शकाल!

मंडळी, लॉकडाऊन काळाचा काही नवीन शिकण्यासाठी उपयोग करा आणि त्याद्वारे भविष्यातील संधी मिळवा.  प्रवेश मर्यादित आहेत… त्वरित संपर्क साधा!

आणि हो, फीज अगदी अत्यल्प आहे बरं का. इतर वेळी हजारो रुपये याच कोर्ससाठी भरावे लागतात परंतु सध्या लॉकडाऊनमुळे नगण्य फिस ठेवण्यात आलेली आहे. 

अधिक माहितीसाठी संवेदन रायटिंग अकॅडमीचा संपर्क क्रमांक -

7715830574/ 7715901298

 

लेखक : अनुप कुलकर्णी

सबस्क्राईब करा

* indicates required