बा अदब! बा मुलाहिजा! होशीयार!! वनराज सिंह आणि कुटुंब रस्ता पार करत आहेत!!

Subscribe to Bobhata

काल संध्याकाळी पिपावाव -राजुला महामार्गावर जे प्रवास करत होते त्यांना एक अपूर्व दृश्य दिसलं. चक्क फूलटू बारा सिंहांची गँग या महामार्गावर उतरली होती. कदाचित  त्यांना हा महामार्ग पार करून पलिकडं जायचं होतं .

सुरुवातीला ते थोडेसे बावचळले.  अहो, फक्त तेच नव्हे तर महामार्गावर असणारे सर्व चालकही हे दृश्य बघून विस्मयचकित झाले. हळूहळू सर्व वाहनं थांबली. या गँगच्या म्होरक्या सिंहाने रस्ता पार करण्याचं नेतृत्व स्वतःच्या अंगावर घेतले आणि थोड्याच वेळा सर्व सिंह - सिंहिणी आणि छावे आपल्या मार्गाला लागले. 

बरेचदा लाखो रुपये खर्च करून , दहा-दहा दिवस अभयारण्यात घालवून देखील जो नजारा बघायला मिळत नाही ते भाग्य काल काहीजणांच्या नशिबात होतं.  स्थानिकांच्या मते गीरच्या जंगलात काही ठिकाणी वणवा लागल्यानं हा सिंहांचा कळप ते स्थलांतरीत झाला असावा. 

अर्थातच, तेव्हाही लगोलग मोबाईलचे कॅमेरे सरसावले आणि काही जणांनी या घटनेचा व्हिडिओ शूट केला. चला, आपणही बघू या घरबसल्या ही क्लिप !!

सबस्क्राईब करा

* indicates required