विजय चव्हाण यांना श्रद्धांजली....पाहूया त्यांची अजरामर कलाकृती 'मोरूची मावशी' !!

वयाच्या ६३ व्या वर्षी विजय चव्हाण आपल्याला सोडून गेले. विनोदाचं अचूक टायमिंग असलेला आणि हरहुन्नरी कलाकार म्हणून ते ओळखले जायचे. आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी चित्रपट, नाटक, मालिका या तिन्ही माध्यमात आपली छाप सोडली. जवळजवळ ४०० चित्रपट, ‘तू तू मी मी’, ‘इशी ही फसवा फसवी’, ‘नवरा म्हणू नये आपला’ ही नाटकं आणि अनेक सिरियल्स मधून त्यांनी काम केलं.

स्रोत

त्यांच्या गाजलेल्या नाटकांबद्दल सांगायचं झालं तर श्रीमंत दामोदर पंत आणि मोरूची मावशी या नाटकांची नावे घेतलीच पाहिजेत. या दोन्ही नाटकांनी त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली असली तरी ‘मोरुशी मावशी’ या नाटकाची बातच काही और आहे. मोरुशी मावशी मधलं काम आजही लोक विसरू शकलेले नाहीत.

'मोरूची मावशी' नाटकाचा मुहूर्त (स्रोत)

आज विजय चव्हाण यांच्या आठवणीत मोरूची मावशी हे संपूर्ण नाटक खाली देत आहोत. या गुणी कलाकाराने अचानक एक्झिट घेतली असली तरी त्याच्या कलाकृती नेहमीच जिवंत राहतील.
बोभाटातर्फे या गुणी कलाकाराला आदरांजली !!

सबस्क्राईब करा

* indicates required