मावळ्यांनो शिवाजी महाराजांचं चरित्र 'एॅनिमेटेड' रुपात येतंय...लवकर ट्रेलर बघून घ्या !!

Subscribe to Bobhata

निश्चयाचा महामेरू ।

बहुत जनांसी आधारू ।

अखंड स्थितीचा निर्धारु ।

श्रीमंत योगी ।

 

ज्या एका नावाने अंगात उर्जा संचारते, ज्यांच्याबद्दल नुसतं ऐकलं तरी अंगावर काटा येतो, ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपतींवर आजतागायत अनेक साहित्य तयार झालं. अनेकांनी शिवाजी महाराज त्यांच्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला पण शिवाजी महाराज हे काही साधं प्रकरण नव्हे. त्यांच्यासाठी कितीही पानं खर्च केली तरी पूर्ण सांगता येणार नाही. चरित्र, सिनेमे, नाटकं, पोवाडे, गाणी, चित्रकला, इत्यादी कलाक्षेत्राला एक आवाहन पुरून उरलं आहे ते म्हणजे शिवाजी महाराज.

१९६१ साली आलेल्या ‘राजा शिवछत्रपती’ पासून ते लवकरच येऊ घातलेल्या रितेश देशमुखच्या ‘छत्रपती शिवाजी’ पर्यंत मोठ्या पडद्यावर शिवाजी महाराजांचं रूप उभं राहिलं. सिनेमांबरोबर अनेक नाटकही तयार झाली. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे त्याचच एक उत्तम उदाहरण. शिवकल्याण राजा सारखं संगीतमय रूप देखील लता मंगेशकर यांच्या आवाजात साकार झालं.

मंडळी आज शिवाजी महाराज यांच्याबद्दल भरभरून बोलण्याचं कारण म्हणजे शिवाजी महाराज यांच्यावर येऊ घातलेला नवा कोरा ‘एॅनिमेटेड सिनेमा’. या सिनेमाचं नाव आहे ‘प्रभो शिवाजी राजा’. आजतागायत खऱ्याखुऱ्या माणसांनी महाराज साकारले पण आता एॅनिमेटेड रुपात शिवाजी महाराज दिसणार आहेत. या सिनेमाचा ट्रेलर आला आहे भावांनो. ट्रेलर बघून अंगावर काटा येईल.

निर्माते : Infinity visual & Mefac

लेखक : समीर मुळे

दिग्दर्शक : निलेश मुळे

जय भवानी !! जय शिवाजी !!

सबस्क्राईब करा

* indicates required