आलीय नवी वेबसिरीज हॉलिवूड- पहिलीत का सिनेमावेड्या गावाची जगाला शहाणं करणारी गोष्ट ?

मंडळी, फिल्ममध्ये आपलं नाव करायला आलेल्या मुलांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होताना दिसते. यासाठी मुंबई सारख्या शहरातच येण्याची गरज असते असं नाही. फिल्ममध्ये हिरो/हिरोईनचा रोल देतो म्हणून पैसे लुबाडणारे गावोगावी सापडतील. अशा माणसांमुळे अनेक स्वप्नं उध्वस्त झाली आहेत. आज आम्ही याच विषयावरची एक वेब सिरीज तुमच्या भेटीला घेऊन आलो आहोत. या वेबसिरीजचं नाव आहे ‘हॉलीवूड’.

या वेबसिरीजची कथा ग्रामीण भागातील कलाकारचं वास्तव मांडणारी आहे. एक कलाकार आणि त्याला भुलवून पैसे कमावणाऱ्यांच्या भोवती हे कथानक फिरतं. पण या वेबसिरीज मध्ये हा विषय अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने, विनोदाची पेरणी करत खुलवला आहे. 

वेबसिरीजचं कथानक काय आहे ?

या सिरीजचं कथानक गुंज्या या बेरोजगार तरुणापासून सुरु होतं. त्याला कामाचा प्रचंड कंटाळा असतो आणि त्यामुळे त्याची सतत हेळसांड होत असते. काम न करण्याच्या सवयीमुळं त्याचा त्याच्या आबाकडून कायम पाणउतारा होत असतो. या सर्व गोष्टीला वैतागून तो त्याचा मित्र पंज्याला सोबत घेऊन घराबाहेर पडतो. सायकलवर गावातून फिरत असताना गुंज्याच्या निदर्शनास येतं की गावातील लहान लेकरापासून ते वृद्ध मंडळीपर्यंत सगळीकडे सिनेमाचा विषय आहे.

सिनेमा-वेड्या गावाचं हे निरीक्षण करुन गुंज्या एक भन्नाट प्लॅन करण्याच्या हेतूनं शेजारच्या गावात राहणाऱ्या मित्राकडे जातो. पुढे काय घडतं ते तुम्ही प्रत्यक्षात बघा राव.

या वेबसिरीजचं दिग्दर्शन राहुल पुणे आणि दिलीप घाटुळ यांनी केलं आहे आणि  छायांकन प्रतीक भेंडारे, संकलन शुभम कोकाळे तर संगीत विनय देशपांडे यांनी केलंय.

मंडळी, एका सामजिक विषयाला विनोदी ढंगाने मांडण्याचा हा एक प्रयोग आहे. याचा प्रत्येक एपिसोड हसत हसत बोध देऊन जातो. तर मंडळी पाहायला विसरू नका बरं का !!

सबस्क्राईब करा

* indicates required