या शीख ऑफीसरने प्राणांची पर्वा न करता जे केलं त्यामुळे तुमचा माणुसकीवरचा विश्वास नक्कीच वाढेल!

Subscribe to Bobhata

मंडळी काहीच दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला आरिफ खान यांची बातमी दिली होती. आरिफ खान यांनी रक्तदान करण्यासाठी आपला रोजा तोडला होता. मंडळी, अशीच एक माणुसकीवरचा विश्वास वाढवणारी आणखी घटना नुकतीच घडली आहे..

मंडळी, बातमी आहे उत्तराखंडच्या गिरीजा गावातली. या गावातल्या एका मंदिरात एक मुस्लीम मुलगा आणि हिंदू मुलगी भेटले. आजूबाजूच्या लोकांना जेव्हा समजलं की हा मुलगा मुस्लीम आहे तेव्हा त्यांनी मुलाला मारहाण करायला सुरुवात केली.

स्रोत

मुलीने मारहाणीबद्दल जाब विचारल्यावर लोक म्हणाले, ‘आम्ही याला सोडणार नाही...याचे तुकडे तुकडे करू...तू एका मुस्लीम मुलाबरोबर फिरतेस म्हणून तुझेही आम्ही तुकडे करू....”

लोकांनी मंदिराचा गेट बंद करून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. हे जेव्हा तिथल्या एका शीख पोलीस ऑफिसरला दिसलं तेव्हा तो लगेचच मुलाच्या मदतीला धावला. त्याने मुलाला संरक्षण दिलं आणि तिथल्या प्रत्येकाला ‘याला हात लावायचा नाही’ असं ठणकावून सांगितलं. लोकांनी दोघांनाही घेराव टाकला. या गोष्टीला अत्यंत हिंसक वळण लागणार होते.

स्रोत

लोकांचा राग वाढला होता. पण या पोलीस ऑफिसरने संख्येने जास्त असलेल्या जमावात न डगमगता मुलाला संरक्षण दिलं. मग जमावाने पोलिसांविरुद्ध घोषणाबाजी सुरु केली. काही वेळात हा विरोध निवळला. पुढे या दोघांनाही त्यांच्या आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आलं.

स्रोत

या पोलीस ऑफिसरचं नाव आहे ‘गगनदीप सिंग’. त्याच्या प्रसंगावधानामुळे एक मोठं अनर्थ टळलं. त्याच्या या कामगिरीने सोशल मिडीयावर एकच चर्चा सुरु आहे. जात-धर्माच्या पुढे जाऊन एक माणूस आणि एक पोलीस म्हणून गगनदीपने जी जबाबदारी पार पाडली त्याचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे.

 

आणखी वाचा :

रोजा तोडला म्हणून या मुस्लीम बांधवाची होतेय प्रशंसा....कारण वाचून तुम्हीसुद्धा मान्य कराल !!

सबस्क्राईब करा

* indicates required