computer

ऑलिम्पिकमध्ये सहभागी सायकलिस्टचा मृत्यू झालाय....मृत्यूपूर्वी तिने इंस्टावर खेळाडूंवरच्या तणावाबद्दल काय म्हटलं होतं?

क्रीडा जगत सध्या विविध खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये मिळवलेले यश साजरे करत असताना दुसरीकडे २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेली सायकलपटू ऑलिव्हिया पॅडमोर हिच्या अकाली मृत्यूने सर्वांना धक्का बसला आहे.

अवघे २४ वर्ष वय असलेली न्यूझीलँडची ऑलिव्हिया हिच्या मृत्यूने जगभरातल्या खेळाडूंना आणि इतरही लोकांना संभ्रमात टाकले आहे. ऑलिव्हियाने नुकतीच केलेली आणि लगेच डिलीट झालेली इन्स्टाग्राम पोस्ट बरेच काही सांगून जाते.

खेळत असताना जिंकण्यासाठी किती मोठा मानसिक दबाव आणि तणाव खेळाडूंवर असतो याबद्दल तीची पोस्ट होती. तिच्या निमित्ताने खेळजगतात यश मिळाल्यावर मिळणारी प्रसिद्धीबरोबर जिंकण्यासाठी किती भयानक तणावातून जावे लागते यावर चर्चा सुरू झाली आहे. अनेक खेळाडूंकडून याच तणावातून खेळादरम्यान चुका होत असतात.

ऑलिव्हिया ८ व्या वर्षांची असल्यापासून सायकलींग स्पर्धांमध्ये भाग घेत होती. २०११ साली तिने १४ व्या वर्षी तिने राष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धा जिंकत २०१५ साली तिने ज्यूनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली होती. पुढे २०१६ ऑलिम्पिकमध्येही तिने सहभाग घेतला.

इतकी प्रतिभावंत खेळाडू आपल्या मृत्यूच्या काही तास आधी जिंकण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न आणि हरल्यावर समाजाकडून होणारे दुर्लक्ष यावर बोलते हा निश्चितच योगायोग नसावा. तिच्या दुर्दैवी मृत्यूचा पोलीस तपास करत आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required