‘पद्मावती आणि पोपट’ : ‘पद्मावत’ सिनेमा नाही बघितला तरी चालेल पण हा व्हिडीओ नक्की बघा !!

पद्मावती किंवा पद्मावत ‘पिच्चर’ कॉन्ट्रोवर्सीमधून आता थेट थेटरात आलाय राव. पद्मावती सिनेमा कसा आहे? चांगला आहे की वाईट? त्यात इतिहासाची मोडतोड केली आहे का? करणी सेना जे करत होती ते बरोबर आहे का? पद्मावत बघणं सुरक्षित आहे का?....वगैरे प्रश्न बाजूला ठेवून तुम्ही हा व्हिडीओ बघा राव.

‘वरूण ग्रोव्हर’ने या व्हिडीओमध्ये पद्मावती आणि तिच्या पोपटाची जी गोष्ट सांगितली आहे, ती सिनेमात पण पाहायला मिळणार नाही. एका पोपटाने पद्मावती आणि राजा रतनसिंगची कशी ‘सेटिंग’ लावून दिली हे वरूण ग्रोव्हरच्याच शब्दात ऐकायला हवं...वरुणने हलक्या फुलक्या विनोदी ढंगातून हलकेच चिमटे देखील काढले आहेत राव. आता तुम्हीच बघा ही गोष्ट :

वरून ग्रोव्हरविषयी थोडं :

वरून ग्रोव्हर लेखक, कवी, गीतकार, पटकथाकार आहे. अनुराग कश्यपच्या बऱ्याच सिनेमांमध्ये त्याने गीत लेखन केलं आहे. त्याने लिहिलेला ‘मसान’ सिनेमा राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत जाऊन आला. त्याला स्वतःला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required