पाकिस्तानच्या नवरदेवाने 'अंडरटेकर'च्या स्टाईल मध्ये मारली एन्ट्री...व्हिडीओ बघून घ्या राव !!

आपण कितीही म्हणालो ना की डब्ल्यू.डब्ल्यू.ई (WWE) फेक आहे आणि सगळं बंडल असतं तरी त्यांची मारामारी बघायला मजा येते हे आपल्याला मान्य करावंच लागेल. ते लोक पडद्यामागे कसे राहतात ते माहित नाही पण रेसलिंग रिंग मधली त्यांची टशन जाम भारी वाटते राव. याच डब्ल्यू.डब्ल्यू.ई मधला एक अविभाज्य भाग म्हणजे “अंडरटेकर”.

भाऊ, अंडरटेकर म्हणे आता रिटायर झालाय, पण त्याचं फॅड काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. त्याची ती अफलातून एन्ट्री आणि मागून घंटा वाजल्याचा आवाज. लय लय भारी राव. आता या त्याच्या एन्ट्रीने एका पाकिस्तानी नवरदेवाला इतकं प्रेरित केलंय की त्याने लग्न मंडपात चक्क अंडरटेकरच्या स्टाईलने एन्ट्री मारली. (आता लग्न करतोय की हाणामारी करतोय म्हणून नवरीकडच्यांना टेन्शन आलं असणार यात शंका नाही.) वऱ्हाडी मंडळी तोंडात बोटं घालून नुसती बघत राहिली ना राव. तुम्हीपण हा व्हिडीओ एकदा बघून घ्याच.

याआधी पाकिस्ताना मधल्याच एका नवरदेवाने ‘ट्रिपल-एच’ च्या स्टाईल मध्ये अशीच एन्ट्री मारली होती. तो व्हिडीओ इतका व्हायरल झाला की  चक्क ट्रिपल-एच ने याची दाखल घेत ट्विट केलं होतं. आता हा नवीन व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

लग्न करणाऱ्या आगामी नवरदेवांना आम्ही काही अश्याच भन्नाट एन्ट्री सुचवत आहोत. त्याचा नक्कीच विचार करा :

१. जॉन सीना

२. रँडी ऑर्टन

३. डॅनियल ब्रायन

५. रॉक

६. बटीस्टा

 

बघा जमतंय का !!

सबस्क्राईब करा

* indicates required