computer

हिंदी सिनेमे आणि पारसी कनेक्शन...तुमचा यातला आवडता सिनेमा कोणता ?

मुळचे भारतातील नसूनही भारतीय मातीत सामावून गेलेले असे हे ‘पारसी’. मूळचे इराणचे पण त्यांना स्वतःचाच देश सोडून पळावं लागलं. त्यातल्या काहींनी भारतात आश्रय घेतला आणि इथेच कायमचे राहिले. या समाजात असलेला मनमिळावूपणा क्वचितच इतरांमध्ये दिसून येतो.

त्यांच्या अनोख्या जीवनशैलीवरुन त्याचं चित्रण बॉलीवूडमध्येही झालं. आपल्या गाडीवर नित्तांत प्रेम करणारा, हुशार आणि भाषेचा वेगळा लहेजा असणारा असं त्यांचं पात्र. तुम्हाला मुन्नाभाई एम.बी.बी.एस मधला ‘रुस्तम पावरी’ आठवत असेल जो मुन्नाभाईला कॉपी करण्यास मदत करतो. शिवाय गेल्याच वर्षी आलेला अक्षय कुमारचा ‘रुस्तम’ हा सिनेमा.

मंडळी आज पतेती, पारसी नववर्ष. त्यानिमित्ताने बघूया बॉलीवूडमध्ये सादर झालेले काही पारसी पात्रं मध्यवर्ती भूमिकेत असलेले काही सिनेमे....

१. खट्टा मिठा !!

आपल्या अक्षय कुमारचा नाही बरं का ! हा १९७८ सालचा खट्टा मिठा आहे. अशोक कुमार, राकेश रोषण, पर्ल पदमसी अशा कलाकारांनी सिनेमा हा साकारलाय. होमी मिस्त्री नामक एका रिटायर्ड माणसाला म्हातारपणातला आधार म्हणून लग्न करायचं असतं आणि त्याची भेट होते नर्गिस नामक विधवा स्त्रीशी. पुढे ते दोघे लग्न करण्यस सज्ज होतात पण या दरम्यान दोन्ही कुटुबं कसे एकमेकांना सांभाळून घेतात याची ही कथा!!

थोडा है, थोडे की जरूरत है हे गाणं याच सिनेमातलं...

२. पेस्तन्जी

अनुपम खेर, नसिरुद्दीन शहा आणि शबाना आझमी या दिग्गजांनी नटलेला हा सिनेमा मैत्रीवर भाष्य करतो. या सिनेमाची खासियत म्हणजे मुंबईमधल्या पारसी लोकांचं जीवन यात जवळून चित्रित केलेलं आहे.

३. परसी

परवेझ मेहरवानजी हे स्वतः पारसी आहेत, त्यांनीच हा सिनेमा लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. आई आणि मुलामधील नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे.
 

४. अर्थ (Earth)

भारत पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळची ही कथा आहे. लेनी या एका पारसी मुलीची ही कथा आहे.

५. बिंग सायरस

मुख्य कथानक एका पारसी व्यक्तीच्या भोवती फिरत असलेलाहा पहिला बिग बजेट सिनेमा होता.  हा सिनेमा संपूर्ण इंग्रजीत आहे. सैफ अली खान, बोमन इराणी, नसिरुद्दीन शहा अशी फौज या चित्रपटात आहे. सैफ अलीच्या कारकिर्दीतला हा खूप मोठा सिनेमा आहे.

६. परझानिया

गुजरातमध्ये झालेल्या २००२ च्या दंगलीचा परिणाम १० वर्षांच्या एका पारसी मुलावर कसा होतो यावर हा सिनेमा बेतला आहे. हा सिनेमा पाहायचा असेल तर तुम्हांला हिंसाचार आणि दुःख पाहण्याची तयारी ठेवावी लागेल. भल्याभल्यांना हा सिनेमा पूर्ण पाहता आला नाहीय.
 

७. लिटिल ज़िज़ु !

लिटील जिजु सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारात रजत कमळ पुरस्कार पटकावला. एका पारसी मुलाच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे.
 

८. फरारी की सवारी

राजेश मापुसकर म्हणजे आपले व्हेन्टीलेटरचे दिग्दर्शक हो.. यांचा हा पहिलाच सिनेमा. रुस्तम देबू या पारसी माणसाचं पात्र शर्मन जोशीने साकारलं आहे. ३ वेगवेगळ्या पिढ्यांमधले संबंध हा सिनेमा ठळक करतो. त्याच्या मुलाच्या कायोमंडच्या क्रिकेटवेडावर हा सिनेमा आहे. या सिनेमासाठी सचिननं त्याची फेरारी वापरायला दिली होती असं म्हणतात.
 

९. शिरीन फरहाद की तो निकल पडी !

बोमन इराणी आणि खुद्द फराह खान यांच्या जोडगोळीने सिनेमात रंगत आणली होती. विनोदी पद्धतीने हा सिनेमा खेळवला आहे. साधारण मध्यमवयीन जोडीची ही गोष्ट!
 

१०. रुस्तम !

गेल्याच वर्षी आलेला हा सिनेमा नौदलातील एका अधिकाऱ्याची कथा सांगतो. रुस्तम पावरी हा अधिकारी एका खुनाच्या खटल्यात अडकतो आणि पुढचं नाट्य घडत जाते. रुस्तम पावरीच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारला त्याच्या आयुष्यातील पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला !

 

 

याखेरीज आणखी कोणते पारसी सिनेमे तुम्हांला आठवतात ?

सबस्क्राईब करा

* indicates required