रणबीर कपूर साकारणार आता बालगंधर्वांची भूमिका(!)
तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज एक भारी बातमी तुमच्या टाईमलाईनवर आली आहे. रणबीर कपूरला म्हणे बालगंधर्वांचा रोल ऑफर झालाय. आपल्या रवी जाधवने मराठीत टाईमपास केल्यानंतर हिंदीत बॅंजो वाजवला आणि आता तो चक्क बालगंधर्व या चित्रपटाचा हिंदी रिमेक करणार आहे.
बाजीराव म्हणून रणवीर सिंगला सहन करण्यापेक्षा रणबीरला या भूमिकेत पाहण्यात मजा येईल. हे काम वाटतं तेवढं सोपं नाही हो राव! बालगंधर्व स्वतः खूप थोर होते, त्यांच्यासारखी स्त्री भूमिका जमणं सोपं नाहीए, सुबोध भावेने हे शिवधनुष्य जेमतेम पेललं होत, रणबीरसमोर हे मोठं चॅलेंज असणार आहे.
आजवर तो भूमिका निवडण्यात हुशार आहे असे मानलं जातं म्हणे. तर रणबीर हा रोल स्वीकारतो का नाही ते बघूयात.




