व्हिडिओ- दिवसाढवळ्या चोरी करताना CCTV मध्ये कैद झाले हे चोर
गेल्या दोन दिवसांपासून सोशल मिडियावर हा व्हिडिओ आणि या चोरांचे फोटो फिरत आहेत. नक्की शहर कोणतं आहे हे कळलं नाही तरी भारतातलंच आहे हे नक्की.
चोर्या साधारण रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत होतात. त्यातही चोर म्हटलं की साधारण एक चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहातं. पण चांगले कपडे घातलेले चोर दिवसाढवळ्या चोर्या करताना दिसले तर मात्र आपल्याला नक्कीच असुरक्षित वाटेल. या व्हिडिओत अगदी सहजतेने बिल्कुल आवाज न करता दाराचं कुलूप तोडण्याचं या चोरांचं कसब चांगलंच दिसतं. नशीबानं तिथल्याच CCTV मध्ये हे चोर रेकॉर्ड झालेयत.

अशा परिस्थितीत आपल्या सोसायटीच्या वॉचमनना इमारतीत शिरणार्या लोकांची नीट चौकशी करूनच आत सोडायला सांगणं हाच एक करता येण्यासारखा उपाय दिसतोय.




