व्हिडीओ ऑफ दि डे : रणवीर सिंगने साजरा केला मराठमोळ्या 'सिद्धार्थ जाधव'चा वाढदिवस....व्हिडीओ पाहून घ्या राव !!

रणवीर सिंग आणि आपला मराठमोळा सिद्धार्थ जाधव त्यांच्या अफलातून एनर्जीसाठी ओळखले जातात. समजा दोघे एकत्र काम करत असतील तर काय धम्माल होईल ? हा योग जुळून आला आहे रोहित शेट्टीच्या आगामी ‘सिम्बा’ सिनेमाच्या निमित्ताने.  

आज आम्ही या सिनेमाबद्दल बोलणार नाही आहोत, तर सिनेमाच्या सेटवर घडलेल्या एका प्रसंगाबद्दल बोलणार आहोत. २३ ऑक्टोबर म्हणजे आपल्या सिद्धार्थ जाधवचा ‘हॅप्पी बड्डे’. यावर्षी त्याचा वाढदिवस चक्क सिम्बाच्या सेटवर साजरा करण्यात आला. यावेळी रोहित शेट्टी, रणवीर कपूर आणि संपूर्ण सिम्बा टीम उपस्थित होती.

स्रोत

याप्रसंगी चित्रित करण्यात आलेला एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. सिम्बाच्या सेटवर एकच जल्लोषाचा माहोल होता. सगळी टीम सेलिब्रेशनसाठी एकत्र आली होती. थोड्याचवेळात रोहित शेट्टीने तिथे एन्ट्री घेतली. पण सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ‘रणवीर सिंग’ने. रणवीर आपल्या नेहमीच्याच अंदाजात ‘बार बार दिन ए आये’ गाण्यावर नाचताना दिसतोय. त्याला साथ मिळाली आपल्या सिद्धार्थ जाधवची. मग पुढे काय घडलं ? पाहा हा व्हिडीओ !!

मंडळी, आपल्या सिद्धार्थ जाधवला हा वाढदिवस आयुष्यभर लक्षात राहील हे नक्की.

सबस्क्राईब करा

* indicates required