computer

सेक्रेड गेम्समधल्या गुरुजीचा आश्रम आहे या ठिकाणी.....कोणकोण जाणार ?

परवा सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन रिलीज झाला. या सीझनमधलं गुरुजी हे एक प्रमुख पात्र होतं. पहिल्या सीझनमध्ये आपण गुरुजीची झलक बघितली होती. या पर्वात मात्र गुरुजी संपूर्ण कथेच्या केंद्रस्थानी आहेता.

या पात्राला स्पेशल टच दिलाय अर्थातच पंकज त्रिपाठी या अफलातून कलाकाराने. त्याचबरोबर पात्रांच्या तोंडी असलेले संवाद पण तितकेच महत्वाचे आहेत. पण एक गोष्ट  प्रेक्षकांनी नक्कीच बघितली असेल. ती गोष्ट म्हणजे गुरुजीचा आश्रम. 

गुरुजी जे उपदेश देत असतात त्याला पोषक असं आश्रमाचं वातावरण दाखवलेलं आहे. त्यामुळे कथा प्रभावी होते. आपल्याला वाटू शकतं की हा आश्रम म्हणजे शूटींगसाठी उभारलेला सेट असावा, तर तसं नाहीय. हा आश्रम चक्क दिल्लीत आहे आणि तिथे तुम्ही आम्ही जाऊ शकतो.

मंडळी, आपण ज्याला आश्रम समजतोय ते आश्रम नसून दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शेजारी असलेलं पंचतारांकित हॉटेल आहे. या हॉटेलचं नाव आहे ‘रोसेट हाऊस’. दुसऱ्या भागात दिसणाऱ्या आश्रमाचा बराचसा भाग या हॉटेलमध्ये चित्रित झालेला आहे. आश्रमाचं अंगण, मोठमोठ्या भिंती, सरताज जिथून आश्रममध्ये प्रवेश करतो ते दार... हे सगळं त्या हॉटेलचाच भाग आहे. 

सेक्रेड गेम्समध्ये आश्रम जेवढा शांत दिसतो तेवढं हे हॉटेल शांत आहे का ?

नक्कीच आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनातून ब्रेक घेण्यासाठी ही जागा तुम्हाला नक्कीच आवडेल. बाब एवढीच, की हे पंचतारांकित हॉटेल असल्याने शांतता मिळवण्यासाठी मोठी किंमत चुकवावी लागते. एकंदरीत सैराटच्यावेळी जशी लोकेशन पाहण्यासाठी गर्दी झाली होती तशी गर्दी करण्याचं हे ठिकाण नाही.

मग कोणकोण जाणार गुरुजींच्या आश्रमात??

सबस्क्राईब करा

* indicates required