अगं बाई अरेच्चा ! आज संजय नार्वेकराचा वाढदिवस !!!

संजय नार्वेकर.मराठी आणि हिंदी चित्रपसृष्टीतील एक गाजणारे नाव ! संजयचे नाव ऐकले की आपल्या पुढे उभा राहतो तो म्हणजे महेश मांजरेकर दिग्दर्शत 'वास्तव' चित्रपट मधील देड फुट्या! १७ जुलै १९६२ साली मालवण सिंधुदुर्ग मध्ये जन्मलेल्या संजयने  १९८८ साली आलेल्या 'अंधा युद्ध' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तब्बल ५६ मराठी चित्रपटात काम केलेल्या संजयचे गाजलेले मराठी चित्रपट म्हणजे अगं बाई अरेच्चा, खबरदार, टाईमपास 3, ये रे ये रे पैसा, ठाकरे, 35 टक्के काठावर पास, चष्मे बहाद्दूर.
मराठी चित्रपट सृष्टी मध्ये चांगले यश मिळाल्या नंतर संजय ला हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये पण चांगले यश लाभले. पण हिंदी मध्ये त्याला खरी ओळख मिळवून दिली ती म्हणजे महेश मांजरेकर यांच्या 1996 साली आलेल्या 'वास्तव' चित्रपटाने. या मधील त्याने साकारलेल्या देड फुट्या ची भूमिका चांगलीच गाजली.त्या भूमिकेचे त्याने अक्षरशः सोनं केलं. या भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअरचे बेस्ट supporting ॲक्टर चे नामांकन सुद्धा मिळाले. संजयचा मुलगा आर्यन नार्वेकर याने पण २००९ साली आलेल्या बोक्या सातबंडे या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टी मध्ये पदार्पण केले. अशा मराठमोळ्या संजय चा आज १७ जुलै रोजी वाढदिवस. आगामी काळात त्याच्या कडून अनेक चांगले चित्रपट आणि भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळतील अशी आशा करू या.बोभाटाच्या शुभेच्छा !

सबस्क्राईब करा

* indicates required