हुर्रेsss... साराभाई परत येत आहे.. रिलीज डेट मे मध्ये! 

आजवर साराभाई परत येतं आहे अशा बर्‍याच बातम्या आल्या आणि विरल्यासुद्धा. पण गेल्या जुलैमध्ये जे डी मजेठियाने या सगळ्या अफवा बंद केल्या आणि  साराभाई वेबसिरीज स्वरूपात परत येतंय असं त्याने जाहिर केलं.

 आज त्यांच्या टीमने एक मेजर अनाऊन्समेंट केली आहे.  मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या सिरीज चे शूटिंग चालू होतंय आणि मे महिन्यात साराभाई कुटुंब आपल्या भेटीला येतंय.

स्त्रोत

या मालिकेचा प्रोड्युसर आणि खिचडी मालिकेतल्या हिमांशूच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेल्या जमानादास मजेठिया यांनी ही माहिती दिली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओरिजिनल कास्ट जशास तशी असणार आहे, आणि स्टोरी सात वर्षे पुढे सरकणार आहे. तुमच्या-माझ्या सारख्या फॅन्सच्या प्रेमामुळं ही सिरीज परत येत आहे.

मग चला, रोसेशच्या कवितांचं पुन्हा एकदा पारायण करायला लागूया.. आवडते ना तुम्हांला पण, "जेली गिरे जमींपर, आवाज आये ब्लूप ब्लूप!!"

सबस्क्राईब करा

* indicates required